घरमुंबईईदच्या बकर्‍यांसाठी ऑनलाईन परवाना

ईदच्या बकर्‍यांसाठी ऑनलाईन परवाना

Subscribe

बकर्‍यांसाठी ऑनलाईन परवाना जरी असला तरी देवनारमधून कुर्बानीसाठी बकरा बाहेर नेताना त्या परवान्याशी मिळती जुळती वैध कागदपत्रे आणि ओळखपत्र दाखवणे बंधनकारक आहे, असा युक्तिवाद करत मुंबई महापालिकेने बकरी ईदसाठी देण्यात येणार्‍या ऑनलाईन परवान्यांचे बिनधास्तपणे समर्थन केले.

बकर्‍यांसाठी ऑनलाईन परवाना जरी असला तरी देवनारमधून कुर्बानीसाठी बकरा बाहेर नेताना त्या परवान्याशी मिळती जुळती वैध कागदपत्रे आणि ओळखपत्र दाखवणे बंधनकारक आहे, असा युक्तिवाद करत मुंबई महापालिकेने बकरी ईदसाठी देण्यात येणार्‍या ऑनलाईन परवान्यांचे बिनधास्तपणे समर्थन केले. महापालिकेच्या वतीने अ‍ॅड. अनिल साखरे यांनी हा युक्तिवाद केला.

ऑनलाईन परवाने देताना जागेचा पत्ता आणि सोसायटीची एनओसी वेबसाईटवर जोडणे आवश्यक करण्यात आल्याचे महापालिकेतर्फे कोर्टाला सांगण्यात आले. एका कुटुंबात एक याप्रमाणे कुर्बानीसाठी परवाने देण्यात आले आहेत. तसेच कुर्बानी देताना सोसायटीची परवानगी, कुर्बानीची जागा चारही बाजूंनी बंद असणेही आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर या दोन्ही दिवशी दिवसभर कुर्बानीचे अवशेष उचलण्यासाठी महापालिकेतर्फे वॉर्डनुसार कचरा उचलणार्‍या गाड्या फिरतीवर असणार आहेत. जेणेकरुन प्राण्यांच्या अवशेषांमुळे इतर समस्या निर्माण होणार नाहीत, असेही पालिकेतर्फे हायकोर्टात सांगण्यात आले.

- Advertisement -

बकरी ईदनिमित्ताने दिल्या जाणार्‍या ऑनलाईन परवान्यांना ‘जीव मैत्री ट्रस्ट’तर्फे हायकोर्टात आव्हान देण्यात आले. त्यावर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. महापालिकेने दिलेल्या या उत्तरावर समाधान व्यक्त करत हायकोर्टाने पालिकेला ऑनलाईन परवान्यांकरता हिरवा कंदील दिला आहे. आठ आठवड्यांनंतर होणार्‍या सुनावणीत पालिकेला कबूल केल्याप्रमाणे नियम पाळल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.


रत्नाकर मतकरींना शासनाचा पुरस्कार

 

- Advertisement -
ratnakr matkari
रत्नाकर मतकरी

मुंबई । महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीतर्फे 2017-18 चा कवी नर्मद मराठी साहित्य पुरस्कार सुप्रसिद्ध साहित्यिक रत्नाकर मतकरी आणि कवी नर्मद गुजराती साहित्य पुरस्कार माधव रामानुज यांना घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण येत्या 24 ऑगस्ट 2018 रोजी सायं 6.00 वाजता झवेरबेन पोपटलाल सभागृह ऑडिटोरीअम, घाटकोपर येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणार्‍या अन्य पुरस्कारांमध्ये जीवनगौरव साहित्य पुरस्कार भरत नायक-गीता नायक, जीवनगौरव कला पुरस्कार प्रवीण सोलंकी, जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार केतन मिस्त्री, जीवनगौरव संस्था पुरस्कार सोलापूर गुजराती मित्रमंडळ यांना घोषित करण्यात आला आहे.

या पुरस्कार सोहळ्यास सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार किरीट सोमैया आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीतर्फे गुजराती भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत साहित्यिकांना पुरस्कृत करण्याकरिता दरवर्षी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -