घरमुंबईपूल, इमारत कोसळण्याच्या दुर्घटना टाळता येणार

पूल, इमारत कोसळण्याच्या दुर्घटना टाळता येणार

Subscribe

अत्याधुनिक ‘कॅट्स ग्लोबल’ तंत्राचा वापर पालिकेच्या विचाराधीन

उड्डाण पूल किंवा इतर कोणत्याही वास्तूला काही धोका किंवा हानी झाली आहे का? याची अद्यायावत माहिती देणार्‍या फोटोनिक कॅटस् ग्लोबल या लेझर प्रणालीवर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत ठाणे महापालिका विचाराधीन असून बुधवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासमोर या तंत्रज्ञानाचा वापर कसा होवू शकतो, याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर आणि समीर उन्हाळे आणि इतर अधिकारीही उपस्थित होते.
कॅटस् ग्लोबल या संस्थेने हे तंत्रज्ञान निर्माण केले असून लेझर प्रणालीचा वापर करून ध्वनी-कंपनांच्या माध्यमातून एखाद्या वास्तूच्या संरचनात्मक आरोग्याची माहिची तात्काळ मिळविता येणे शक्य झाले आहे.

भारतीय रेल्वे, केंद्रीय रस्ते विभागामध्येही या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे एखाद्या वास्तूमधील धोक्याची किंवा हानीची माहिती मिळून संभाव्य धोका टाळता येणे शक्य होणार आहे. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एखाद्या वास्तूला किंवा संरचनेला कसली हानी झाली आहे का, ती हानी नेमकी कोणत्या ठिकाणी झाली आहे, ती हानी कोणत्या प्रकारची आहे, त्याची व्याप्ती आणि तीव्रता काय आहे याची इत्यंभूत माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर ती वास्तू किंवा स्ट्रक्चर किती मजबूत आहे, याचाही अहवाल या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळण्यास मदत होणार आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे.

- Advertisement -

महत्वाच्या इमारती त्याचबरोबर शहरातील धोकादायक इमारतींची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग महत्वपूर्ण ठरणार असल्याने त्यादृष्टीनेही या तंत्रज्ञानाच्या वापराविषयी जयस्वाल यांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या. त्याचबरोबर प्रायोगिक तत्वावर कळवा पूलाच्या काही भागाची माहिती या तंत्रज्ञानाचा वापर करून घेता येईल का याची पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -