घरमुंबईकोरोना वॉरियर्सने भर पावसातही मेगाब्लॉकची मोहिम केली फत्ते! 

कोरोना वॉरियर्सने भर पावसातही मेगाब्लॉकची मोहिम केली फत्ते! 

Subscribe

रविवारी रात्रीकालीन मेगाब्लॉक दरम्यान मध्य रेल्वेच्या कोरोना वॉरियर्सनी देखभाल दुरुस्तीचे काम भर पावसात केले.

भारतीय  रेल्वे करोनाविरोधाच्या लढाईत मोठ्या प्रमाण योगदान देत आहेत. कोरोना संकटकाळात आपल्या जीवाची आणि कुटूंबियांची पर्वा न करता लॉकडाऊन काळात आयसोलेशन कोचस निर्मिती पासून ते  जीवश्यक वस्तूची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली आहे. तसेच आता मध्य रेल्वेनी  उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत  तांत्रिक कामे करण्यासाठी  नियमित, घेण्याची सुरुवात केली आहे. मात्र रविवारी घेण्यात आलेल्या रात्रीकालीन मेगाब्लॉकमध्ये कितीतरी पट्टीने मध्य रेल्वेचा कर्मचाऱ्यांनी कामे पूर्ण केली आहेत. विशेष म्हणजे रविवारी  विद्याविहार-ठाणे अप व डाउन  जलद मार्गावरील ब्लॉक दरम्यान मध्य रेल्वेच्या कोरोना वॉरियर्सनी देखभाल दुरुस्तीचे काम भर पावसात केले. त्यामुळे त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अभियांत्रिकी कामे 

भांडुप ते मुलुंड दरम्यान १.५४ किमी. रूळांचे नूतनीकरण,  रोड रेल वाहनांद्वारे सुमारे १०० स्लीपर रिप्लेसमेंट आणि ५५ स्क्रॅप रेल काढून टाकले, पॉइंट्स आणि क्रॉस ओव्हर पॉईंट्स रिप्लेसमेंट व ६ ठिकाणी एल्युमिनो-थर्मिक वेल्डिंग पूर्ण केली.

- Advertisement -

ओव्हर हेड उपकरणे

 दोन टॉवर वॅगन्स आणि एका शिडी गॅगसह कार्य केले. २५० मीटर लांबीचे कॉन्टॅक्ट वायर रिप्लेसमेंट केले; ३ स्प्लाइस आणि ४ कमकुवत पॉईंट काढले. अंदाजे एक किमी ओएचई वार्षिक ओव्हरहॉलिंग, टर्न आऊट, ४० बाँडची  तरतूद आणि बदलले;  ३९ प्लेट्सची तरतूद करण्यात आली.

सिग्नल आणि दूरसंचार कार्ये

ऑडिओ फ्रीक्वेंसी ट्रॅक सर्किटचे ट्यूनिंग कार्य केले.  घाटकोपर येथे १० एस-बॉन्ड, १० ट्रॅक सर्किटच्या ट्रॅक लीड वायर्स, ५० चॅनेल पिन बदलण्यात आले तसेच लोकेशन बॉक्स (एलओसी) ची देखभाल करण्यात आली.   ५ ठिकाणी गंधकांनी साफसफाई, ट्रॅक २२१-टी च्या ग्ल्यूड जॉइंट बदलण्यात आली, पॉवर रूम उपकरणांची ब्लोअरने साफसफाई, विक्रोळी येथे के-बोर्ड डिस्क्रीप्शन चाचणी/अद्ययावत करण्यात आली.  मालमत्ता चांगल्या स्थितीत राहण्यासाठी सर्व कामे केली गेली.
याव्यतिरिक्त, रूळ नूतनीकरण ब्लॉक ठिकाणी ७.१ मिमी सायकलनुसार  २४ छिद्रे पाडण्यात आली; पाइंट  ११५-बी मोटर आणि फ्रिक्शन क्लच बदलली, २ डिजिटल ॲक्सल काउंटरचे  सेन्सर बदलले, ऑडिओ फ्रीक्वेंसी ट्रॅक सर्किट ट्यूनिंगचे  काम केले,  ८ एस-बॉन्ड बदलले , ८ ट्रॅक सर्किटच्या ट्रॅक लीड वायर्स बदलले,  ३ लोकेशन्स बॉक्सची देखभाल केली गेली व ४० चॅनेल  पिन बदलले. सर्वसाधारणपणे आणि विशेषत: पावसाळ्यात ट्रेनच्या कार्यक्षम संचालनामध्ये डिजिटल एक्सेल काउंटर सेन्सर महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.  ट्रॅक साइडला  इलेक्ट्रॉनिक असेंब्ली असलेले फील्ड युनिट जाणा-या (पासिंग) चाकांची नोंद  घेतात आणि ट्रॅकची व्याप्ती (ऑक्युपेशन) निश्चित करण्यासाठी ती माहिती केंद्रीय मूल्यांकन कर्त्याकडे पाठवतात.

- Advertisement -

जुना पादचारी पूल पाडण्यात आला

वाशिंद येथील १०० वर्षाहून अधिक जुना पादचारी पूल (फुट ओव्हर ब्रिज ye -एफओबी) देखील निर्धारित वेळेत रोड क्रेनचा वापर करून पाडण्यात आला.  यात प्रत्येकी १८.९ मीटर आणि २.५९ मीटर रुंदीचे दोन स्पॅन होते.  या पुलाच्या ऐवजी एक नवीन पादचारी पूल (एफओबी) आधीपासून वापरात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -