घरमुंबईआसनगाव-आटगावदरम्यान मालगाडीचं इंजिन फेल, मध्य रेल्वे खोळंबली

आसनगाव-आटगावदरम्यान मालगाडीचं इंजिन फेल, मध्य रेल्वे खोळंबली

Subscribe

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आसनगाव-आटगावदरम्यान मालगाडीचं इंजिन फेल झाल्याचा फटका मध्य रेल्वेच्या प्रवाशांना पडला आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. मागील काही वेळेपासून मध्य रेल्वेच्या गाड्या धिम्या गतीने चालत आहेत. आसनगाव-आटगावदरम्यान मालगाडीचं इंजिन फेल झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाले आहे. दरम्यान रेल्वे अधिकाऱ्यांनी हे इंजिन हटवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. लकरवच रेल्वे मार्ग हा गाड्यांसाठी खूला केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाही तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे ही विस्कळीत झाली होती. नवीन वर्षातही मध्ये रेल्वेची अवस्थाही जैसे थे असल्याचे दिसून येते आहे. नव वर्षाच्या सुरुवातीला आज दुसऱ्यांदा वाहतूक विस्कळीत झाली आहे.

दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांची प्लॅटफॉर्मवर गर्दी झाली आहे. आसनगाव-आटगावदरम्यान मालगाडीचं इंजिन फेल झाले आहे. दरम्यान कल्याणकडे जाणारी जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. लवकरच वाहतूक पूर्ववत होईल अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -