घरमुंबईआधी रेल्वे रुळावरून घसरली, मग डब्यातून धूर; कुर्ला स्थानकावरील प्रकार

आधी रेल्वे रुळावरून घसरली, मग डब्यातून धूर; कुर्ला स्थानकावरील प्रकार

Subscribe

विद्याविहार आणि कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान लोकल रेल्वे रुळावरून घसलरी आणि त्यानंतर डब्यातून धुर निघू लागल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सीएसटीकडे जाणारी लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे सदर लोकल ट्रेनमधून प्रवाशांनी उड्या टाकून रेल्वे स्थानकाकडे पायी चालत जात आहेत. रेल्वेचे अभियांत्रिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. मात्र दुरुस्तीसाठी बराच वेळ लागणार असल्यामुळे रात्रीपर्यंत तरी रेल्वेसेवा पुर्ववत होणार नाही. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणारी स्लो ट्रॅकवरील वाहतुक पुर्णपणे विस्कळीत झाली आहे.

आज रविवार असल्यामुळे मेगाब्लॉक होता, त्यामुळे अर्ध्याहून अधिक ट्रेन रद्द केलेल्या आहेत. त्यातच आज सकाळी ठाणे रेल्वे स्थानक येथे प्रगती एक्सप्रेसचे इंजिन बंद पडले होते. त्यामुळे एक तास मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प होती. आता संध्याकाळी मेगाब्लॉक संपताक्षणी विद्याविहार आणि कुर्ला दरम्यान रेल्वे रुळावरून घसरली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -