घरमुंबईमध्य रेल्वेने ऑगस्ट महिन्यात वसूल केला ११ कोटींचा दंड

मध्य रेल्वेने ऑगस्ट महिन्यात वसूल केला ११ कोटींचा दंड

Subscribe

मध्य रेल्वेकडून फुकट्या प्रवाशांविरोधात मोहीम राबवण्यात आली होती. या मोहीमेमध्ये मध्य रेल्वेने ऑगस्ट महिन्यात तब्बल ११ कोटींचा दंड वसूल केल्याचे उघड झाले आहे.

मध्य रेल्वेकडून वारंवार आवाहन करुन देखील या मार्गावर दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच स्वत:चे आरक्षित तिकीट दुसऱ्याला देणे, विना तिकीट प्रवास करणे या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे अशा फुकट्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने मोहीम सुरू केली आहे. फुकट्या प्रवाशांविरुद्ध ऑगस्ट महिन्यामध्ये कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये मध्य रेल्वेने कडक कारवाई करत ऑगस्ट महिन्यात तब्बल ११ कोटी २८ लाख रुपये दंड वसूल केला आहे.

२ लाख ५३ गुन्ह्यांची नोंद

मध्य रेल्वेने अशा फुकट्या प्रवाशांविरुद्ध ऑगस्ट महिन्यामध्ये केलेल्या कारवाईत २ लाख ५३ हजार गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यामधून ११ कोटी २८ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. २०१७ च्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत या वर्षी फुकट्यांकडून दंड वसूलीत वाढ झाली असून गेल्यावर्षीच्या दंडापेक्षा २१. ६३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

एप्रिल ते ऑगस्टदरम्यान १५ लाख केसेस

एप्रिल २०१८ ते ऑगस्ट २०१८ या कालावधीत १५. ७० लाख फुकटे प्रवासी आढळले आहेत. तर, १४ कोटी लाख ७ लाख प्रकरण आढळली होती. तसेच या महिन्यात ३३८ आरक्षित तिकीटांचं हस्तांतरण झाल्याचे आढळून आले आहे. त्यातून २. ८८ लाख दंड वसूल केला आहे. तर, फुकट्या प्रवाशांविरुद्ध एप्रिल ते जुन महिन्यामध्ये केलेल्या कारवाईत मध्य रेल्वेने तब्बल ५९ कोटी ३६ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. मध्य रेल्वेकडून वारंवार आवाहन करुनही या मार्गावर दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे प्रवाशांनी विनाऊट तिकीट प्रवास करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

फुकट्यांची आकडेवारी

  • एप्रिल ते जून २०१८ मध्ये १० लाख ८५ हजार विना तिकिट प्रवास केला असून त्यांच्याकडून ५९ कोटी ३६ लाख दंड वसूल करण्यात आला आहे.
  • एप्रिल ते जून १७ दरम्यान ९ लाख ८३ हजार प्रवाशांकडून ५४ कोटीची दंड वसूली करण्यात आली आहे.
  • तर जून २०१८ या महिन्यात ३ लाख २६ हजार प्रवाशांकडून १७ कोटी २०लाख दंड वसूल करण्यात आला.
  • जून २०१७ या महिन्यात २ लाख ५८हजार प्रवाशांकडून १२ कोटी ७८ लाख दंड वसूल करण्यात आला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -