घरमुंबईतर भाजपा कार्यकर्त्यांनी सुद्धा मोर्चे काढावेत - चंद्रकांत पाटील

तर भाजपा कार्यकर्त्यांनी सुद्धा मोर्चे काढावेत – चंद्रकांत पाटील

Subscribe

विमा कंपन्यांविरोधात शिवसेनेने आज मुंबईत मोर्चा काढत विमान कंपन्या आणि बँकांना १५ दिवसांचा अवधी दिला. शिवसनेच्या या मोर्च्याचे नवनियुक्त भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समर्थन केले असून,
‘सरकारचं काही चुकत असेल तर भाजपा कार्यकर्त्यांनी देखील मोर्चे काढावेत ज्यातून प्रश्न सुटतील’, असे सांगितले. आज चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

‘पाच वर्षांत भाजपने जनतेला सुखी ठेवलं. मुख्यमंत्र्यांनी चांगलं काम केलं. आता पक्ष वाढवण्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत युतीचं राज्य पुन्हा आणण्याचं काम करू. जे आतापर्यंत यश मिळालं याचं श्रेय संघटनेचं आहे’, असे देखील चंद्रकात पाटील म्हणाले. ‘राज्यात विधानसभेच्या २२७ जागांवर आपण पुढे आहोत. युती होणार आहे. आपल्या मित्रपक्षालाही निवडून आणायचं आहे. तरच आपली सत्ता येईल’, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. ‘काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपात आला तर कोणाला आश्चर्य वाटायला नको’, अशी सूचक प्रतिक्रिया देखील महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -