घरमुंबईबदलापूरमध्ये केमिकल कंपनीत स्फोट

बदलापूरमध्ये केमिकल कंपनीत स्फोट

Subscribe

कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलने भरलेली ड्रम आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने कंपनीच्या आत स्फोट होत आहेत. त्यामुळे परिसरात जोरदार आवाज येत असून तर ४ ते ५ किलोमीटरवर धुराचे लोट पसरले आहेत.

बदलापूर एमआयडीसीतील कंपनीमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. प्लाटिनम पॉलिमर या कंपनीमध्ये केमीकल ड्रमचा स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आग भीषण असून आसपासच्या परिसरामध्ये धुराचे लोट पसरले आहेत.

बदलापूरच्या एमआयडीसीमधील प्लेटिनम पॉलीमर या केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ६ गाड्या दाखल झाल्या आहेत. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलने भरलेली ड्रम आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने कंपनीच्या आत स्फोट होत आहेत. त्यामुळे परिसरात जोरदार आवाज येत असून तर ४ ते ५ किलोमीटरवर धुराचे लोट पसरले आहेत. या स्फोटामुळे आणि भीषण आगीमुळे नागरिकांची पळापळ झाली आहे. आतापर्यंत या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी नसल्याचे वृत्त आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -