घरमुंबईछगन भुजबळांना हायकोर्टाचा दिलासा; यापुढे देशात कुठेही जाता येणार

छगन भुजबळांना हायकोर्टाचा दिलासा; यापुढे देशात कुठेही जाता येणार

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. भुजबळ यांना आता कोर्टाच्या पूर्वपरवानगीशिवाय देशभरात कुठेही जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जामीन मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ यांना देशभरामध्ये कुठेही जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्राबाहेर जाण्यापूर्वी तपास अधिकाऱ्याला आपल्या वास्तव्याचा पत्ता द्यावा असे हायकोर्टाने सांगितले आहे. यापूर्वी छगन भुजबळ यांना पूर्व परवानगीशिवाय देशात कुठेही जाणे बंधनकारक होते.

देशाबाहेर कुठेही जाऊ शकणार

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जामीन मिळाल्यानंतरही छगन भुजबळ यांना राज्याबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली होती. राज्याबाहेर जाता यावे यासाठी छगन भुजबळ यांनी मुंबई हायकोर्टात अर्ज दाखल केला होता. त्याअर्जावर आज सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान कोर्टाने त्यांना राज्याबाहेर जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे यापुढे छगन भुजबळ राज्याबाहेर कोठेही जाऊ शकणार आहेत.

- Advertisement -

ईडीने फेटाळला होता अर्ज

छगन भुजबळ यांची ४ मे रोजी मुंबई हायकोर्टाने जामीनावर सुटका केली. मात्र जामीन देते वेळी हायकोर्टाने छगन भुजबळ यांच्यावर अनेक अटी लादल्या होत्या. त्यामध्ये राज्याबाहेर कुठेही जाण्यापूर्वी सत्र न्यायालयाची पूर्वपरवानगी घेण्याचे हायकोर्टाने सांगितले होते. वारंवार परवानगी मागावी लागू नये यासाठी त्यांनी थेट ईडीकडे अर्ज केला होता. मात्र ईडीने तो अर्ज फेटाळून लावला होता. राज्याबाहेर गेल्यास तुमच्यावर खटला चालवू असे ईडीने सांगितले होते. त्यानंतर त्यांनी थेट हाटकोर्टात परवानगीसाठी अर्ज केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -