घरमुंबईपावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळ विस्तार

पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळ विस्तार

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या मंत्र्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी मंत्रिमंडळ विस्तार आणि आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली.

राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला वेग आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या मंत्र्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी मंत्रिमंडळ विस्तार आणि आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार निश्चित होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले होते.

पावसाळी अधिवेशनाआधी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर लवरच राज्यामध्ये मंत्रीमंडळ विस्तार होणार असून त्यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रंगशारदा येथे पत्रकार परिषदेत बोलताना अधिकृतपणे पुष्टी दिली होती. मात्र हा विस्तार कधी होणार याची तारीख मुख्यमंत्र्यांना सांगितली नव्हती.

- Advertisement -

हेही वाचा – 

मंत्रीमंडळ विस्तार नक्की

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -