घरमुंबईदिवाळीत सिडको काढणार ४९०० घरांसाठी लॉटरी

दिवाळीत सिडको काढणार ४९०० घरांसाठी लॉटरी

Subscribe

दिवाळीच्या मुहूर्तावर सिडको नवी मुंबईत ४ हजार ९०० घरांची लॉटरी काढणार आहेत. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने नवी मुंबईत कोरोना योद्ध्यांना घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कोरोना योद्ध्यांना नवी मुंबईत स्वस्तात घरे मिळणार आहेत.

कोरोना यद्ध्यांच्या कामगिरीबाबत कृतज्ञता म्हणून सिडकोच्या माध्यमातून त्यांच्यासाठी घरे राखीव ठेवण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. या आदेशानुसार सिडकोच्या विशेष गृहनिर्माण योजनेत कोरोना योद्ध्यांसाठी राखीव घरे ठेवण्यात आली आहेत. अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही घरे उपलब्ध असतील.

- Advertisement -

या योजनेअंतर्गत सिडकोकडून संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोनायोद्धे व गणवेशधारी कर्मचार्‍यांकरता नवी मुंबईच्या पाच नोड्समध्ये ४ हजार ४८८ घरे उपलब्ध करून देण्यात येतील. नवी मुंबईच्या तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली व द्रोणागिरी या पाच परिसरांमध्ये ही घरे असतील.

एकूण ४ हजार ४८८ घरांपैकी १ हजार ०८८ घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ठ्या दुर्बल घटकासाठी, ईडब्लूएस आणि उर्वरित ३ हजार ४०० घरे सर्वसाधारण प्रवर्गाकरता आहेत. तसेच, वैधानिक तरतुदींनुसार काही घरे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दिव्यांग प्रवर्गांकरता राखीव आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -