घरमुंबईसानपाडा पुलाखाली भिकार्‍यांंच्या वस्तीने नागरिक हैराण

सानपाडा पुलाखाली भिकार्‍यांंच्या वस्तीने नागरिक हैराण

Subscribe

नवी मुंबई :- शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर भिकार्‍यांनी हैदोस मांडला असून सायन – पनवेल महामार्गावरील सानपाडा पुलाखालील भिकार्‍यांनी तर हद्दच पार केली आहे.येणार्‍या जाणार्‍या गाड्यांसह नागरिकांनाही अडवून त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे मागण्याचे प्रकार वाढले आहेत. यावर शासकीय यंत्रणा शांत असल्याने या भिकार्‍यांनी पुलाखालीच आपले बस्तान मांडले आहे. यांच्या भिक मागण्याने वाहतुकीलाही अडथळा होत असून त्यांनी आपला पसारा सानपाडा रेल्वे स्थानक आणि एपीएमसी सिग्नलपर्यंत वाढवला आहे. त्यांच्या सोबत असलेली लहान मुलेही अशाच प्रकारे भिक मागतात, पैसे नाही दिले तर अंगाला झोंबतात. त्यांच्यावर वेळीच अंकुश ठेवला नाही तर या ठिकाणी अपघात वाढण्याची शक्यता आहे.

या उड्डाणपुलाखालील जागेवर आश्रय घेण्यास भिकार्‍यांनी सुरुवात केली आहे. ‘बेघर नागरिकांचे हक्काचे घर’ असे स्वरूप सानपाडा रेल्वेस्थानका समोरील उड्डाणपुला आले आहे. पुलाखाली चुली पेटवल्या जात आहेत. उड्डाणपुलांखालील जागेची धर्मशाळा झाली आहे. अमली पदार्थांच्या आहारी गेलेले तरुण पुलाखाली आश्रय घेत आहेत. अनेक वेळा तर भिकार्‍यांची भांडणे सुरू असतात. पुलाखालील जागेवर घाणीचे साम्राज्य पसरू लागले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. त्यात रात्र झाली की दारू पिऊन धिंगाणा घालण्याचे प्रकार सर्रास घडतात.

- Advertisement -

भिकारी आणि बेघरांमुळे नेहमीच येथे गोंधळाचे वातावरण असते.अनेक वेळा त्यांची आपसात भांडणे होत असल्याचे पहावयास मिळते. शहरात बेघर व निराश्रित नागरीकांसाठी पालिकेच्यावतीने रात्र निवारा केंद्र बांधण्यात येणार आहे. मात्र हे सर्व कागदावरच राहिल्याने अशा बेघर व निराश्रितांची संख्या वाढू लागली आहे. रात्र निवारा केंद्राच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली असली तरी प्रत्यक्षात काम सुरू झाले नाही.याबाबत पालिका अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही

2013 च्या न्यायालयाच्या निर्णयानुसार 1 लाख लोकसंख्ये मागे एक रात्र निवारा केंद्र आवश्यक आहे. मात्र, शहराच्या लोक संख्येच्या तुलनेत रात्र निवारा केंद्र फक्त कागदावरच राहिले आहे. रात्र निवारा केंद्र जर असती तर उड्डाणपुला खाली असणारी भिकारी आणि बेघरांची वस्ती हटली असती .
-अनरजित चौहान ,सामाजिक कार्यकर्ता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -