घरमुंबईपंकजा मुंडेंचा यावर्षीचा दसरा मेळावा वादाच्या भोवर्‍यात

पंकजा मुंडेंचा यावर्षीचा दसरा मेळावा वादाच्या भोवर्‍यात

Subscribe

गेल्या दोन वर्षांपासून दाव्याने सुरू केलेला महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा भगवान गडावरचा दसरा मेळावा पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. गेल्या वर्षी गडावर मेळावा योजण्यास प्रशासनाने नकार दिला होता. अखेर मुख्यमंत्र्यांना तेव्हा मध्यस्थी करावी लागली होती. याही वेळी हे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या दरबारी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळच्या दसरा मेळाव्याला गर्दी व्हावी, म्हणून मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून ऊसतोड कामगार आणि वाहनचालकांची अडवणूक केली जात असल्याच्या वाढत्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. गर्दी व्हावी म्हणून संप लांबवण्याचा घाट घातला जात आहे.

भाजपचे दिवंगत नेते आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी १९९६ पासून भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली होती. मात्र भगवान गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर गडावर दसरा मेळावा घेण्यास प्रतिबंध केला. यातून मंत्री पंकजा आणि शास्त्री यांच्यात मोठा संघर्ष उडाला. मुंडे यांना वडिलांप्रमाणेच गडावरच मेळावा घ्यायचा होता. तो मठाधिपतींनी घेऊ दिला नाही. तेव्हा आव्हान म्हणून तो पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे भगवान बाबांच्या जन्मगावी सुरू केला. भगवान गडावरील मेळावे म्हणजे मुंडे घराण्याची राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न मानला जातो.

- Advertisement -

आगामी काळातील लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यावर्षी पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याची जय्यत तयारी केली आहे. दोन दिवसांपूर्वी धारूर तालुक्यात ऊसतोड कामगारांचा ट्रक कारखान्यात जात असताना मुकादम संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी तो अडवला. त्या ट्रकची तोडफोड करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ट्रकच्या तोडफोडीनंतर त्या ट्रक मालकाला ८ हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आला होता. या घटनेनंतर मुंडेंच्या दसरा मेळाव्याबाबत प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. दसर्‍याचा मेळावा यशस्वी करण्यासाठी मेळावा होत नाही, तोवर हातात कोयता घ्यायचा नाही, असा अलिखित फतवा काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तसा दमच ऊसतोड कामगारांनी दिला जात असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -