घरमुंबईमल्टिप्लेक्सच्या समोसामध्ये कापडी चिंधी, गिऱ्हाईकानं लगावली कानशिलात!

मल्टिप्लेक्सच्या समोसामध्ये कापडी चिंधी, गिऱ्हाईकानं लगावली कानशिलात!

Subscribe

कल्याणमधील एका मल्टिप्लेक्समध्ये समोसामध्ये कपड्याचा तुकडा सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कल्याणमध्ये समोसामध्ये कापडाचा तुकडा आढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कल्याणमधील नामांकित एसएम ५ या मल्टीप्लेक्सध्ये ही घटना समोर आली आहे. हा समोसा खाल्ल्यामुळे एका महिलेला उलट्या झाल्या. या घटनेमुळे मल्टिप्लेक्समध्ये आलेल्या प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे.

प्रतिभा खरात या आपल्या मैत्रिणीसोबत एसएम ५ मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेल्या होत्या. चित्रपटाच्या मध्यांतरात त्यांनी मल्टिप्लेक्समधील स्टॉलवरून तब्बल ९० रुपये देऊन २ समोसे विकत घेतले. त्यातील एक समोसा त्यांनी खाल्ला आणि दुसरा समोसा अर्धा खाऊन होत असताना त्यांना त्यामध्ये कपड्याचा मोठा तुकडा आढळला. तो पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांच्या मैत्रिणीला हा समोसा खाऊन उलट्या झाल्या.

- Advertisement -

दरम्यान, प्रतिभा खरात या महिलेने याबाबत मल्टिप्लेक्स व्यवस्थापनाकडे जाब विचारत आपल्या नातेवाईकांना फोन करून बोलवले. यावेळी संतप्त महिलेने मल्टिप्लेक्समधील कर्मचा-याच्या कानशिलात लगावलीी. त्यानंतर खरात यांनी थेट महात्मा फुले पोलीस ठाणे गाठले. दरम्यान, या प्रकारणी तक्रार नोंदविण्याचे प्रक्रिया सुरू आहे. मात्र मल्टिप्लेक्समधील महागडे खाद्यपदार्थ आणि त्यांच्या दर्जाबाबत या घटनेने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -