घरमुंबई१० रुपयांची थाळी म्हणजे बोलाचीच कढी बोलाचाच भात!

१० रुपयांची थाळी म्हणजे बोलाचीच कढी बोलाचाच भात!

Subscribe

ठाण्यात भाजपचा आरोप

शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचा दिलेला शब्द,अवकाळी पावसाच्या नुकसानी बाबत २५ हजार रुपये देण्याचे आश्वासन,जी दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे तीही मार्च मध्ये होणार आहे असे राज्यसरकारचे काम चालू आहे. त्याचप्रमाणे १० रुपयांची थाळी म्हणजे बोलाचीच कडी बोलाचाच भात असल्याचा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा आरोप यांनी बुधवारी ठाण्यात केला. नागरिकत्व सुधारणा कायदा या विषयावर भाजपची बाजू मांडतानाच जनजागृती करण्याची मोहीम राबवण्यात येत असून त्याचसाठी भाजपच्या खोपट येथील मुख्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपाध्ये यांच्यासह शहर अध्यक्ष संदीप लेले , आमदार निरंजन डावखरे आदी मान्यवर उपस्थित होते.

नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात गैरसमज पसरवण्याचे काम काँग्रेससह इतर विरोधी पक्ष करत आहेत, पतपेटीच्या राजकारणासाठी काँग्रेसचे राजकारण सुरु असून याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला असल्याचा गंभीर आरोप उपाध्ये यांनी यावेळी केला. जे आरोप करण्यात येत आहेत त्यात घटनेच्या १४ व्या कलमाचा भंग होत असल्याचे सांगण्यात येत आहेत मात्र हे चुकीचे असून सर्व धर्मांना समान अधिकार आहेत. मात्र, असमानांना समान वाटप केल्यास अन्याय होणार आहे, याचाही विचार व्हायला हवा, या कायद्याच्या समर्थनार्थ लाखो नागरिक रस्त्यावर उतरले असून लोकसभेत शिवसेनेने जी भुमीका घेतली तीच ते कायम ठेवतील असा आशावादही केशव उपाध्ये यांनी यावेळी व्यक्त केला .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -