घरमुंबईMumbai Power Cut: वीज पुरवठा खंडित कसा झाला? तातडीने चौकशी करा; मुख्यमंत्र्यांचे...

Mumbai Power Cut: वीज पुरवठा खंडित कसा झाला? तातडीने चौकशी करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

Subscribe

वीज खंडित प्रकरणी ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी केली चर्चा

मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. वीज खंडित प्रकरणी ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली. मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत तसेच कोण जबाबदार आहेत त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी दिले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही याबाबत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या.
या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे आणि तात्काळ मदत करावी असेही ठाकरे यांनी मुख्य सचिव तसेच मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, मुंबईला आज वीजेअभावी मोठा फटका बसला आणि विशेषत: कोरोनाच्या कालखंडात तर हा फटका आणखी गंभीर बनला. सर्वसामान्यांच्या जीवनात खंड पाडणार्‍या आणि यामुळे जवळजवळ संपूर्ण मुंबई ठप्प करण्यासाठी जबाबदार कोण? असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

आतातरी महाविकास आघाडीचे सरकार स्वत:हून पुढाकार घेऊन पुन्हा अशी परिस्थिती उदभवू नये, यासाठी पाऊले टाकेल का? अशी अपेक्षा आपल्याला आता तरी करता येईल का? रेल्वे, दवाखाने, पाणीपुरवठा अशा सर्वच सुविधा ठप्प पडल्या होत्या. या प्रकाराच्या चौकशीतून काहीतरी निष्पन्न निघेल आणि याची जबाबदारी संबंधितांवर निश्चित केली जाईल अशी आशा करू या, असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.


खंडित वीजपुरवठ्याचा रुग्णसेवेवर तात्पुरता परिणाम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -