घरमुंबईCNG : मुंबईत सीएनजी प्रतिकिलो ६ रुपयांनी स्वस्त

CNG : मुंबईत सीएनजी प्रतिकिलो ६ रुपयांनी स्वस्त

Subscribe

पाईपद्वारे स्वयंपाक गॅसच्या दरात साडेतीन रुपयांनी घट

सीएनजी आणि स्वयंपाकाच्या पाईप गॅसवर आकारल्या जाणार्‍या मूल्यवर्धित करात १० टक्के कपात करण्यात आल्याने राज्यात शनिवारपासून घराघरांमध्ये पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस तसेच वाहनांसाठीचे सीएनजी इंधन स्वस्त झाले आहे.

महानगर गॅसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार मुंबई आणि परिसरात सीएनजी प्रतिकिलो ६ रुपयांनी स्वस्त झाले आहे, तर पीएनजी हा पाईपद्वारे स्वयंपाकाचा गॅस प्रतिएससीएम (स्टॅन्डर्ड क्युबिक मीटर) ३ रुपये ५० पैशांनी स्वस्त झाला आहे. नवीन दराप्रमाणे मुंबई परिसरात सीएनजी ६० रुपये प्रतिकिलो, तर पीएनजी ३६ रुपये प्रतिएससीएम असेल.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन २०२२ -२३चा अर्थसंकल्प सादर करताना सीएनजी आणि पाईप गॅसवरील मूल्यवर्धित कर १३.५ टक्क्यांवरून ३ टक्के करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार १ एप्रिलपासून पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस तसेच वाहनांसाठीचे सीएनजी इंधन स्वस्त झाले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -