घरमुंबईकॉमेडियन तरुणीला बलात्काराची धमकी देणारा अटकेत

कॉमेडियन तरुणीला बलात्काराची धमकी देणारा अटकेत

Subscribe

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विनोद केल्याप्रकरणी कॉमेडियन तरुणीला बलात्काराची धमकी देणार्‍या एका तरुणाला सायबर सेल पोलिसांनी नालासोपारा येथून अटक केली आहे. उमेश दादा ऊर्फ इम्तियाज शेख असे या तरुणाचे नाव आहे. अशाच एका प्रकरणात यापूर्वी पोलिसांनी इम्तियाजचा मित्र शुभम मिश्राला वडोदरा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी दोन आक्षेपार्ह व्हिडीओ युट्यूब अपलोड करुन संबंधित तरुणीला धमकी दिली होती.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी एका स्टॅण्डअप कॉमेडियन तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये या तरुणीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विनोद केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तिला सर्वत्र ट्रोल करण्यात आले. तिच्याविषयी मुंबईसह संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्याचे उत्तर म्हणून काही तरुणांनी तिच्याविषयी अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन तिच्यावर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी मुंबईसह गुजरात पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली होती.

त्यातील एका गुन्ह्यांत शुभम मिश्रा या तरुणाला वडोदरा पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या चौकशीत त्याचा मित्र इम्तियाज शेख यानेही अशाच प्रकारे एक व्हिडिओ व्हायरल करून या कॉमेडियन तरुणीला धमकी दिल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याचा सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु होता. त्याच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरु असताना इम्तियाज शेख हा नालासोपारा परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसाां मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने नालासोपारा येथून इम्तियाजला अटक केली. या गुन्ह्यांत इतर दोघांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे. तो नालासोपारा येथून पळून जाण्याच्या तयारीत होता. त्यापूर्वीच त्याला शिताफीने अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा –

Video : सपना चौधरीचा डान्स यु ट्यूबवर ट्रेंड; आतापर्यंत ७ कोटी प्रेक्षकांनी पाहिला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -