घरमुंबईमध्य रेल्वेच्या ३५ पुलांचे सुरक्षा ऑडीट पूर्ण

मध्य रेल्वेच्या ३५ पुलांचे सुरक्षा ऑडीट पूर्ण

Subscribe

मध्य रेल्वेच्या ३५ पुलांचे सुरक्षा ऑडीट आयआयटीने पूर्ण केली असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा यांनी मुंबई भापज अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना दिली आहे.

मध्य रेल्वेच्या ३५ पादचारी पूल आणि रोड ओव्हर पुलांचे सुरक्षा ऑडिट आयआयटीने पूर्ण केले असून त्यांच्यावर पुढील कार्यवाही सुरु झाली आहे. तर आयआयटी अन्य पुलांचे सुरक्षा ऑडिट करण्याचे काम करीत असून दुसऱ्या टप्प्यातील त्यांचा अहवाल ही लवकरात लवकर येणे अपेक्षित आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा यांनी मुंबई भापज अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना दिली. मध्य रेल्वेच्या पादचारी पुलांच्या सुरक्षेबाबत आलेल्या बातमीची दखल घेत आमदार आशिष शेलार यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा यांची भेट घेतली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेत मुंबईकर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काम कसे करण्यात येते आहे? याबाबतची विचारणा त्यांनी केली.

काय म्हणाले आशिष शेलार?

आशिष शेलार यांनी महाप्रबंधकांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, ‘विविध अभियंत्यांच्या निश्चित केलेल्या जबाबदारीच्या माध्यमातून मध्य रेल्वेमार्फत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आणि त्यानंतर पादचारी पूल आणि रोड ओव्हर पुलांचे सुरक्षा ऑडिट केले जाते. त्यानुसार ऑगस्ट, २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत १९१ पादचारी पूल आणि ८९ रोड ओव्हर पुलांची सुरक्षा ऑडिट आयआयटी मुंबई मार्फत करण्यात आले आहे. या २८० पुलांच्या ऑडिटसाठी ३ कोटी ३७ लाख ८०० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. त्यापैकी १ कोटी ६८ लाख ५० हजार ४०० इतकी रक्कम आगाऊ देण्यात आलेली आहे. परंतु, या कामांसाठी ५०% पेक्षा अधिक रक्कम देऊनसुद्धा अद्याप सुरक्षा अहवाल प्राप्त झालेले नाहीत. तरी मुंबईकरांच्या सुरक्षतेसाठी करण्यात येणाऱ्या या १९१ पादचारी पूल आणि ८९ रोड ओव्हर पुलांचे सुरक्षा ऑडिट लवकरात लवकर पूर्ण करून आहवाल सादर करावा. तसेच सदर अहवालात नमूद बाबींवर पावसाळ्यापूर्वी योग्य ती कार्यवाही करावी.’

- Advertisement -

‘४ पुलांच्या दुरुस्तीचे काम सुरु’

दरम्यान, यावेळी महाप्रबंधकांनी सांगितले कि, ‘आयआयटी मार्फत सुरक्षा ऑडीट टप्याटप्याने करण्यात येत असून अत्यंत जुन्या असणाऱ्या आणि प्रवाशांची वर्दळ जास्त असणाऱ्या पुलांचे ऑडीट पहिल्या टप्यात करण्यात आले आहे. त्यातील ३५ संवेदनशील पुलांचा अहवाल रेल्वेला प्राप्त झाला असून त्यातील ४ पुलांच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. ३ पुलांचे काम पूर्ण झाले आहे. तर ७ पुलांचा वापर बंद करण्यात आले आहे त्यांच्या पुढील कामाला लवकरच सुरवात होणार आहे. १२ पुलांचे काम किरकोळ दुरुस्तीचे असून तेही लवकर करण्यात येईल. भायखळा, करी रोड, चिंचपोकळी आणि घाटकोपर या ४ पुलांचे काम सुचवण्यात आले होते. त्यामध्ये घाटकोपरच्या पुलाखाली असणारा अतिरिक्त फुटपाथ काढण्यात आला असून करी रोड आणि चिंचपोकळी येथील वाहतुकीसाठी वापरत असलेल्या पुलांवर डांबराचा अतिरिक्त थर दिल्याने त्याच्यावरील वजन वाढले आहे. महापालिकेशी समन्वय साधून अतिरिक्त थर काढून त्यावर आयआयटी ने सुचवलेल्या प्रमाणे आवश्यक तेवढाच डांबरीकरण अपेक्षित आहे.’ सर्व पूल मुंबईकरांच्या दृष्टीने महत्वाचे असल्यामुळे भाजप पाठपुरावा करेल असेही आमदार अॅड आशिष शेलार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -