घरमुंबईभरमसाठ शिक्षण शुल्क आकरणीचा मुद्दा चिघळला

भरमसाठ शिक्षण शुल्क आकरणीचा मुद्दा चिघळला

Subscribe

माहिती पुस्तकातील आणि प्रत्यक्षात आकारण्यात येणार्‍या फीमध्ये तफावत

अकरावी प्रवेशात माहिती पुस्तिकेत एक रक्कम आणि विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्षात घेत असलेली फी यामध्ये मोठी तफावत दिसत असून अनेक महाविद्यालये अकरावी प्रवेशात विद्यार्थी व पालकांची लूट करताना दिसत आहेत. असा प्रकार पालकांना लक्षात येत असून आपले प्रवेश महाविद्यालय रद्द करतील, या भितीने कुणी पुढे येत नसल्याचेही दिसून येत आहे.

अकरावी प्रवेश सुरु आहेत. विद्यार्थ्यांना किती फी भरावी लागणार याचा तपशील माहिती पुस्तकात महाविद्यालय, शाखा आणि अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्य अशा पद्धतीने लिहिलेला आहे. मात्र ऑनलाइन प्रवेश घेतल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश घेताना अकरावीच्या पुस्तकात दिलेले फी पालक भरताना महाविद्यालय स्वीकारत नाही. माहिती पुस्तकात दिलेली फी गेल्या तीन वर्षांची आहे. अशी बोळवण करुन आता अमुक इतकी फी भरावी लागणार आहे, असे महाविद्यालयाचे कर्मचारी सांगतात, त्यामुळे पालक हैराण झाले आहेत. माहिती पुस्तिकेत आताची फी द्यावी, असा आम्ही पत्रव्यहार केला आहे, मात्र तो बदल केला जात नाही असेही पालकांना कर्मचारी सांगतात. त्यामुळे माहिती पुस्तिका आणि आणि विद्यार्थ्याकडून घेत असलेल्या फीच्या पावत्यांची माहिती मागवून ही चाचपणी करावी, अशी मागणी पालकांची आहे.

- Advertisement -

पुस्तकातील फी आणि महाविद्यालय घेत असलेली फी याची चाचपणी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून होत नसल्याने हा प्रकार महाविद्यालय करत आहे, असेही पालकांचे म्हणणे आहे. अकरावी प्रवेशावेळी प्रवेश शुल्काच्या नावाखाली लुटमार होत आहे. यासंदर्भात 12 संघटनेने तक्रार केली होती. त्यामुळे सरकारी अनुदान घेत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांनी किती प्रवेश शुल्क घ्यावे. तसेच विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्य तुकड्यात किती फी नियमानुसार घ्यावी याची माहिती अगोदरच पुस्तकात दिलेले असताना महाविद्यालय अशा प्रकारे जादा फी घेवून लुटत आहेत, मात्र शिक्षण उपसंचालक कार्यालयाचा याकडे कानाडोळा असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -