घरमुंबईरेमडेसिवीर इंजेक्शनच्या गुणवत्तेबाबत संभ्रम

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या गुणवत्तेबाबत संभ्रम

Subscribe

कोरोनावर दिलासादायक ठरत असल्याने रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णांना देण्यात येत आहे. मात्र काही रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन देऊनही फरक पडला नसल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

कोरोनावर दिलासादायक ठरत असल्याने रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णांना देण्यात येत आहे. मात्र काही रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन देऊनही फरक पडला नसल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य अन्न व औषध प्रशासनाकडून आतापर्यंत एकाही रेमडेसिवीर इंजेक्शनच्या गुणवत्तेची तपासणी केली नसल्याचा आरोप ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर्स असोसिएशनकडून करण्यात आला आहे.

कोरोनाची लागण होणार्‍या प्रत्येक रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु मागणीच्या तुलनेत पुरवठा नसल्याने इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने उत्पादक कंपन्यांवर इंजेक्शन बनवण्यासाठी प्रचंड तणाव येत आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. नुकतेच एका रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादक कंपनीच्या व्हाईल्समध्ये समस्या असल्याचे उघडकीस आले होते. त्यातच आता काही रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनच्या ८ ते १० व्हाईल्स दिल्यानंतरही त्यांना फारसा फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रेमडेसिवीरच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. राज्यातील प्रत्येक औषधांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर (एफडीए) असते. परंतु सात महिन्यांमध्ये एफडीएकडून एकाही रेमडेसिवीर इंजेक्शनच्या व्हाईल्सची चाचणी केली नसल्याचा आरोप ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी केला आहे.

- Advertisement -

रेमडेसिवीर इंजेक्शनची कालमर्यादा तीन महिन्यांची आहे. तसेच या इंजेक्शनला तापमानही नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. सध्याच्या परिस्थितीमध्ये रेमडेसिवीरची गुणवत्ता खालावण्याची शक्यता अधिक आहे. गुणवत्ता खालावलेले इंजेक्शन रुग्णांना दिल्यास त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे उत्पादक कंपन्यांकडून येणार्‍या इंजेक्शनच्या व्हाईलची गुणवत्ता तपासणे हे अधिक जबाबदारीचे ठरत असल्याचे पांडे यांनी सांगितले. तसेच एफडीएने यापुढे रेमडेसिवीरच्या व्हाईल्सची चाचणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

कोरोनावरील औषध म्हणून रेमडेसिवीरला मान्यता मिळालेली नाही. सध्या हे इंजेक्शन चाचणी स्तरावर आहे. तसेच उत्पादक कंपन्यांकडून इंजेक्शनची चाचणी करूनच बाजारामध्ये आणण्यात येते.
– जुगलकिशोर मंत्री, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -