घरCORONA UPDATEबिगर अत्यावश्यक सेवांची पाच दुकाने सुरु ठेवण्यावरून गोंधळ

बिगर अत्यावश्यक सेवांची पाच दुकाने सुरु ठेवण्यावरून गोंधळ

Subscribe

येत्या सोमवारपासून (४ मे) अत्यावश्यक वगळता पाच दुकाने खुली ठेवण्याचे निर्देश प्राप्त झाले असले तरी राज्याच्या मुख्य सचिवांनी जारी केलेल्या परिपत्रकाबाबत मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मनात संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. या परिपत्रकाची अंमलबजावणी केल्यास केवळ पाच दुकाने सुरु ठेवावी लागतील. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावरील कोणती पाच सुरु ठेवली जावी आणि कोणत्या पाच दुकानांना परवानगी दिली जावी, याबाबतच स्पष्टता नसल्याने सर्वच गोंधळाचे वातावरण आहे.

लॉकडाऊनचा तिसरा टप्पा ३ मे रोजी संपुष्टात आल्यानंतर, ४ मे पासून मुंबईतील कोणत्याही एका रस्त्यांवरील अथवा लेनवरील अत्यावश्यक सेवा वगळता पाच दुकाने खुली ठेवण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिवांनी दिले आहेत. मुख्य सचिवांच्या स्वाक्षरी याबाबतचे निर्देश प्राप्त झाल्याने याची अंमलबजावणी सोमवारपासून केली जाणार आहे. परंतु या परिपत्रकाबाबत स्पष्टताच नसल्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मोठा प्रश्न पडला आहे. मुंबईतील काही रस्ते फार मोठे असून त्या रस्त्यावरील कोणत्या अत्यावश्यक नसलेल्या दुकानांना खुली करण्यास परवानगी दिली जावी, याबाबतचा प्रश्न त्यांना पडला आहे. एका रस्त्यांच्या दोन्ही पदपथावरील प्रत्येकी पाच अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली तर दुसऱ्या दिवशी त्याच दुकानांना परवानगी न देता अन्य दुकानांना परवानगी देण्यासाठी आवश्यक ती तयारीच महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून झालेली नाही.

- Advertisement -

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, परिपत्रकाचा सखोल अभ्यास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. अत्यावश्यक सेवेतील दुकाने ही खुलीच राहणार आहे. परंतु ती वगळता अन्य सेवांच्या प्रत्येक दिवशी पाच दुकानांना परवानगी देताना, तेथील असोशिएशनची चर्चा करणे आवश्यक आहे. त्यामुळे सोमवारी सर्व रस्त्यांवरील असोशिएशनसोबत चर्चा करून त्यांच्या सुचना विचारात घेवून अत्यावश्यक सेवा वगळता पाच दुकाने खुली ठेवण्याचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. त्यानुसारच ही कार्यवाही केली जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -