घरCORONA UPDATECoronavirus: धारावीतील अग्निशमन केंद्राच्या प्रमुख अधिकाऱ्यालाच कोरोनाची बाधा

Coronavirus: धारावीतील अग्निशमन केंद्राच्या प्रमुख अधिकाऱ्यालाच कोरोनाची बाधा

Subscribe

मुंबई महापालिकेच्या बहुतांशी कर्मचाऱ्यांना आता धारावीमुळेच कोरोनाची बाधा होत असल्याचे बोलले जात असतानाच आता त्यात आणखी एका वरिष्ठ अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याची भर पडली आहे. धारावी-शाहू नगर येथील अग्निशमन दल केंद्राच्या प्रमुख अधिकाऱ्यालाच कोरोनाची बाधा झाली असून त्या वसाहतीतील पूर्ण मजला आता सिल करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेच्या आपत्कालिन नियंत्रण कक्षातील दोन बाधित कामगार, महापौर निवासातील एक कामगार, तसेच जलअभियंता विभागाच्या धारावीतील चौकीत सात कामगार कोरोना बाधित झाल्यानंतर आता धारावी-शाहूनगर अग्निशमन केंद्राचे प्रमुख अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या राहत्या इमारतीतील मजला सिल करून त्यांच्या कुटुंबियांसह आसपासच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. मात्र प्रमुख अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाली असली तरी या केंद्रात सॅनिटाझेशन करुन ते सुरु राहणार आहे. त्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हे वाचा – चितांजनक; धारावीत एकाच दिवसात ९६ कोरोनाचे नवीन रुग्ण

यापूर्वी मुंबई अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नी, सून आणि मुलाला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र, त्या अधिकाऱ्याचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असून त्यांचा मुलाचाही चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने तो बरा होवून घरी परतला आहे. मात्र होम क्वारंटाईन असतानाही संबंधित वरिष्ठ अधिकारी हे दूरध्वनीवररून अग्निशमन दलाच्या अधिकारी व जवानांना मार्गदर्शन करत आहेत.

- Advertisement -

याच धारावीमध्ये अन्न वाटपाची मुख्य जबाबदारी पार पाडणाऱ्या एका विभाग निरिक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहेत. त्यातच अशाप्रकारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांमध्येही काहीअंशी भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -