घरCORONA UPDATEकोरोनाचा कहर कायम! मुंबईत घरकाम करणाऱ्या महिला, वृत्तपत्र आणि दूध विक्रेत्यांच्या होणार...

कोरोनाचा कहर कायम! मुंबईत घरकाम करणाऱ्या महिला, वृत्तपत्र आणि दूध विक्रेत्यांच्या होणार चाचण्या

Subscribe

मुंबईत सध्या कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मुंबईत आढळत असलेल्या रुग्णांपैकी ९० टक्क्यांहून अधिक रुग्ण इमारतीत आढळत आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेने कोरोना चाचण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील घरकाम करणाऱ्या महिला, वृत्तपत्र आणि दूध विक्रेत्यांच्या कोरोना चाचण्या केल्या जाणार आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबई महानगरपालिकेने हा मोठा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून १ हजारांहून अधिक रुग्ण दिवसाला आढळत आहे. यामध्ये ९० टक्क्यांहून अधिक रुग्ण इमारतीत आढळत आहेत, तर चाळी किंवा झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या रुग्णांची संख्या केवळ १० टक्के आहे. त्यामुळे महापालिकेने या अनुषंगाने चाचण्या करण्यास सुरुवात केली आहे. इमारतीमधील घरकाम करणाऱ्या महिला, वृत्तपत्र आणि दूध विक्रेत्यांसह सेक्युरिटी गार्डपर्यंत सर्वांच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार आहे. इमारतीतमधील वाढलेला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने चाचण्या करण्यावर भर दिला आहे. त्यादृष्टीने पुढील काळात कठोर उपाययोजन देखील करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान काल (बुधवारी) मुंबईत १ हजार ५३९ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ५ जणांच्या मृत्यू नोंद झाली. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ३७ हजार १२३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार ५११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच काल दिवसभरात ८८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख १३ हजार ३४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – Corona Vaccination : खासगी रुग्णालयांत २४ तास लसीकरण!

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -