घरCORONA UPDATECorona Cases In India: कोरोनाचा पुन्हा उद्रेक! देशात पहिल्यांदाच यावर्षातील सर्वाधिक रुग्णांची...

Corona Cases In India: कोरोनाचा पुन्हा उद्रेक! देशात पहिल्यांदाच यावर्षातील सर्वाधिक रुग्णांची नोंद!

Subscribe

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात आज यावर्षातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात २२ हजार ८५४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १२६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी १२ लाख ८५ हजार ५६१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ५८ हजार १८९ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात गेल्या २४ तासांत १८ हजार १०० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १ कोटी ९ लाख ३८ हजार १४६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १ लाख ८९ हजार २२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

‘या’ आठ राज्यांमध्ये कोरोनाचा कहर

कोरोना काळाच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रात इतर राज्यापेक्षा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. बुधवारी महाराष्ट्रात पहिल्यांदाच यावर्षातल सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले. महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल येथे कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे.

- Advertisement -

दरम्यान वर्ल्डोमीटरनुसार, जगातील कोरोनाबाधितांची संख्या ११ कोटी ८६ लाख २१ हजार पार गेली आहे. यापैकी आतापर्यंत २६ लाख ३१ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ९ कोटी ४२ लाख ३१ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – कोरोनाचा कहर कायम! मुंबईत घरकाम करणाऱ्या महिला, वृत्तपत्र आणि दूध विक्रेत्यांच्या होणार चाचण्या


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -