घरमुंबईखासगी रुग्णालयांत कोरोना लस, एका डोसची किंमत 250 रु.

खासगी रुग्णालयांत कोरोना लस, एका डोसची किंमत 250 रु.

Subscribe

राज्यात पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र दिसत असल्याने सरकार खडबडून जागे झाले असून वैयक्तिक काळजी घेण्याबरोबर बहुतांशी लोकांना लस देण्यासाठी आता पावले टाकली जात आहेत. याचा एक भाग म्हणून खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना लस देण्यात येईल आणि एका डोसची किंमत 250 रुपये असेल.

सध्या कोरोनाशी दोन हात करणार्‍या आरोग्य सेवेतील लोकांना आणि कोरोनाशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लोकांना लस दिली जात आहे. मात्र, बहुतांशी लोक लशीच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच लसीबाबत व त्याच्या किमतींबाबत महत्त्वाची बातमी समोर आल्याने सामान्य जनतेत आनंदाचे वातावरण आहे.

- Advertisement -

खासगी रुग्णालयांमध्ये एका डोससाठी 250 रुपये आकारले जाऊ शकतात, अशी माहिती राज्याचे आरोग्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी शनिवारी दिली. विशेष म्हणजे राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी लसीकरणाच्या मोहिमेबद्दल खासगी रुग्णालयांना सूचित करण्यात आले आहे.

नॅशनल हेल्थ अ‍ॅथॉरिटीचे कार्यकारी अधिकारी आणि केंद्रीय आरोग्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली कोविड 2.0 बाबत झालेल्या प्रशिक्षण आणि व्हर्च्युअल मिटिंगमध्ये सर्व्हिस चार्जसंदर्भात माहिती देण्यात आली होती. डॉ. व्यास पुढे म्हणाले की, कोविड सेंटर्स म्हणून काम करणार्‍या खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणारा सर्व्हिज चार्ज प्रत्येक व्यक्ती व एका डोसमागे 100 रुपयांपर्यंत असेल. यासोबतच रुग्णालये लशींच्या किमतींबरोबरच प्रति व्यक्ती डोस 150 रुपये वसूल करतील. अशातच खासगी रुग्णालयांना प्रत्येक व्यक्तीमागे डोस 250 रुपयांपर्यंत पडू शकेल, असे प्रदीप व्यास म्हणाले.

- Advertisement -

लसीकरण दुसरा टप्पा 1 मार्चपासून

1 मार्चपासून देशात लसीकरण कार्यक्रमाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्‍यांनंतर आता दुसर्‍या टप्प्यात ज्येष्ठांना लस दिली जाणार आहे. विशेष म्हणजे या टप्प्यात ज्येष्ठांव्यतिरिक्त 45-60 या वयोगटातील नागरिकांचा समावेश होईल. शनिवारी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरातमध्ये कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -