Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी CoronaVirus: सावरकर स्मारकाकडून रहेजातील डॉक्टर आणि नर्सना किटचे वाटप

CoronaVirus: सावरकर स्मारकाकडून रहेजातील डॉक्टर आणि नर्सना किटचे वाटप

Subscribe

राज्यासह देशात सध्या कोरोनाचे संकट असून, संकट काळात सर्वच स्थरातून मदतीचे हात पुढे येऊ लागले आहेत. कुणी तोंडाचे मास्क तर कुणी गरिबांना जेवण देण्यासाठी पुढे येत आहेत. मुंबईत देखील अनेक सामाजिक संस्थांनी मदतीचे हात पुढे केले आहेत. त्यातच आता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक व्यवस्थापन समितीच्या वतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.

रहेजातील डॉक्टर्सना ५०० किटचे वाटप

कोरोना रुग्णावर डॉक्टर सध्या आपला जीव धोक्यात घालून उपचार करत आहेत. त्यातच राज्यात सध्या डॉक्टरच्या किट्सचा तुटवडा आहे. यामुळेच स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक व्यवस्थापनाच्या वतीने रहेजा फोर्टिस रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सला ५०० किट्स वाटप करण्यात आला असून, जवळपास सहा लाखांच्या किट्स सावरकरांचे नातू आणि स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कोणताही गाजावाजा न करता या किट्स वाटप करण्यात आल्या.


- Advertisement -

हेही वाचा – Lockdown – लज्जास्पद! स्थलांतरीत मजुरांना जेवणाच्या ताटावरून हुसकावले


 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -