घरताज्या घडामोडीपालिकेने जप्तीची कारवाई करताच मालमत्ता करापोटी ७५ कोटींची वसुली

पालिकेने जप्तीची कारवाई करताच मालमत्ता करापोटी ७५ कोटींची वसुली

Subscribe

मुंबई महापालिकेने मालमत्ता करापोटी ५ हजार २०० कोटी रुपयांचे लक्ष्य गाठण्यासाठी आता लाखो, कोट्यवधी रुपये थकीत ठेवणाऱ्या बिल्डर, कंपनी, सल्लागार आदींच्या महागड्या गाड्या, मालमत्ता सील करणे, पाणी पुरवठा खंडित करणे अशा प्रकारच्या कारवाईचा बडगा उगरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अवघ्या चार प्रकरणात तब्बल ७५ कोटी रुपयांची मालमत्ता कर थकबाकी पालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे.

यंदाच्या वर्षात मालमत्ता करापोटी ५ हजार २०० कोटी रुपये जमा होण्याचे लक्ष्य गाठताना आतापर्यंत पालिकेच्या तिजोरीत ३ हजार ६५० कोटी रुपये जमा झाले असून आणखीन १ हजार ५०० कोटी रुपयांची थकबाकी जमा करणे बाकी आहे.

- Advertisement -

मुंबई माहपालिकेचे उत्पन्नाचे महत्वाचे स्रोत म्हणून मालमत्ता कर वसुलीकडे पाहिले जाते.गेल्या मार्च २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत वाढल्याने आणि लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या, उद्योग, लघु उद्योग, दुकाने, रोजगार आदी बंद पडले. त्याचा मोठा फटका मुंबई महापालिकेलाही बसला आहे. पालिकेच्या उत्पन्नावर त्याचा काहीसा विपरीत परिणाम झाला आहे. त्यातही कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेने आतापर्यंत २ हजार २०० कोटी रुपये विविध उपाययोजनांवर खर्ची केले आहेत.

पालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या आदेशाने आणि अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या कोट्यवधी, लाखो रुपयांच्या थकबाकीदारांविरोधात कडक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – साकीनाका जंक्शन येथील निळकंठ भवनला भीषण आग


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -