घरमुंबईनगरसेवक सुहास देसाई यांचा राजीनामा

नगरसेवक सुहास देसाई यांचा राजीनामा

Subscribe

ठाण्यात राष्ट्रवादीला दुसरा धक्का

विधानसभा निवडणुक तोंडावर आली असतानाच राज्यपातळीवर पक्षांतर कोलांट्या उड्या सुरू असतानाच पालिका पातळीवरही पक्षांतराची लागण ठाण्यात झाल्याचे दिसून येत आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्या नंतर सुहास देसाई यांनी थेट पक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्याकडे त्यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा दिला असला तरी आनंद परांजपे यांनी मात्र तो स्वीकारलेला नाही. सुहास देसाई यांनी मात्र कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.

ठाण्यात विश्वासात न घेता परस्पर विरोधी पक्षाकडून परस्पर निर्णय घेतले जातात तसेच बदलले जातात असा मुद्दा उपस्थित करून ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी आपल्या गटनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आत सुहास देसाई यांनी तर थेट पक्षाचाच राजीनामा दिला आहे. सुहास देसाई यांनी देखील पक्षात आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. महत्वाची पदे दिली जात नाही. प्रामाणिकपणे काम करूनही न्याय मिळत नसल्याने त्यांनी थेट आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत ही खंत व्यक्त केली आहे. त्यामुळे संतापलेल्या सुहास देसाई यांनी थेट पक्षाचा राजीनामा दिला आहे .

- Advertisement -

सुहास देसाई हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असून ते राबोडी येथील प्रभाग क्रमांक 10 मधून नेतृत्व करतात. मराठा समाजाच्या आंदोलनात त्यांचा सक्रिय भाग असून त्यांच्यामध्ये कोकणवासीय आणि मराठा समाज मोठ्या प्रमाणात असल्याने देसाई यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने याचा काही प्रमाणात फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसण्याची चिन्हे आहेत. आनंद परांजपे यांना अध्यक्ष पद देण्यावरून मागेच राष्ट्रवादीचा एक गट नाराज होता. त्यावेळी वातावरण चांगलेच तापले होते.आता हणमंत जगदाळे यांच्या पाठोपाठ देसाई यांनी पक्षाचा राजीनामा दिला असल्याने देसाई यांच्याबाबत जितेंद्र आव्हाड काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे.

प्रत्येक गोष्टीत आम्हाला डावलले जाते. कोणत्याही प्रकारची महत्वाची जबाबदारी दिली जात नाही. त्यामुळे संतापून पक्षाचा राजीनामा दिला आहे. मात्र कोणत्याही पक्षात जाणार नसून प्रामाणिकपणे काम करणार आहे.
– सुहास देसाई , नगरसेवक , राष्ट्रवादी काँग्रेस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -