घरCORONA UPDATEदैनंदिन माहिती कोरोना नियंत्रण कक्षाला कळवणे बंधनकारक; पालिकेची नवीन ‘एसओपी’

दैनंदिन माहिती कोरोना नियंत्रण कक्षाला कळवणे बंधनकारक; पालिकेची नवीन ‘एसओपी’

Subscribe

केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी ‘कंटेनमेंट झोन’ अर्थात बाधित क्षेत्रांसाठी सुनिश्चित कार्यपद्धती (एसओपी) जाहीर केली आहे.

मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या आता वाढू लागली असून इमारतींमधून कोरोना संसर्ग चाळी आणि झोपडपट्टी परिसरांमध्ये होवू लागला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी ‘कंटेनमेंट झोन’ अर्थात बाधित क्षेत्रांसाठी सुनिश्चित कार्यपद्धती (एसओपी) जाहीर केली आहे. त्या एसओपीनुसारच प्रत्येक विभाग कार्यालयांना बाधित क्षेत्रांमध्ये कार्यवाही करून त्यांची माहिती महापालिका मुख्यालयातील यासंदर्भातील नियंत्रण कक्षाला कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार आयुक्तांनी सर्व विभाग कार्याल्यांना निर्देशही दिले आहेत.

कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध स्तरांवर सातत्याने प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे ज्या भागांमध्ये कोरोनाग्रस्त किंवा संशयित कोरोनाग्रस्त आढळून आल्यास त्या अशा परिसरांना बाधित क्षेत्र  म्हणून घोषित करण्यात आले आहे. या अंतर्गत परिसरात राहणाऱ्या नागरिकांना परिसराबाहेर जाण्यास बंदी घालण्यात येते. तसेच बाहेरच्या नागरिकांनाही या परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे. त्यामुळे अशा परिसरांमध्ये महापालिकेच्यावतीने योग्य प्रकारे कार्यवाही करण्याच्या दृष्टीकोनातून एसओपी बनवण्यात आली आहे.

- Advertisement -

बाधित क्षेत्र परिसरातील बाधित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य तसेच संपर्कातील नजीकच्या व्यक्ती यांची ‘हाय रिस्क’ आणि ‘लो रिस्क’ अशा दोन गटात विभागणी करण्यात येत आहे. या दोन्ही गटातील व्यक्तींना विभागीय स्तरावर अधिग्रहित करून तयार करण्यात आलेल्या विलगीकरण सुविधेमध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे. हे विलगीकरण करताना इतरांना त्यांच्यापासून संसर्ग होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. बाधित व्यक्तीच्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या व्यक्तींना महापालिकेने ताब्यात घेतलेल्या हॉटेल्स, लॉज, वसतिगृहे इत्यादी ठिकाणी स्थलांतरित करण्याची कार्यवाही परिस्थितीपेक्षा तसेच गरजेनुसार करण्यात येत आहे. बाधित क्षेत्र परिसरातील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजांच्या वस्तू सशुल्क पद्धतीने देण्याचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. यासाठी पोलिसांसह गॅस एजन्सी, दूध पुरवठादार, अन्नधान्य-भाजीपाला विक्रेते इत्यादींची मदत घेतली जात आहे.

यामध्ये बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेल्या लगतचा परिसर परिस्थितीनुसार ‘बफर झोन’ म्हणून घोषित करत त्यावर देखरेख ठेवणे. ‘बफर झोन’ परिसरात केवळ अत्यावश्यक सेवांसाठी हीच मर्यादित प्रवेश देता येऊ शकेल. बाधित क्षेत्र परिसरात असणारी दवाखाने किंवा रुग्णालये इत्यादी ठिकाणी येणाऱ्या रुग्णांपैकी फ्लू सदृश आजाराच्या रुग्णांची दैनंदिन माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याकडे नियमितपणे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

धक्कादायक! डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातून क्वॉरंटाईन व्यक्ती पळाला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -