घरमुंबईडॉ. पायल तडवी प्रकरण: 'त्या' डॉक्टरांच्या चौकशीसाठी कोर्टाची परवानगी

डॉ. पायल तडवी प्रकरण: ‘त्या’ डॉक्टरांच्या चौकशीसाठी कोर्टाची परवानगी

Subscribe

तिघीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या तिन्ही डॉक्टराकडे सुसाईड नोट प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस तुरुंगात जाऊन चौकशी करणार आहे. या तिघीकडे चौकशी करण्याची परवानगी न्यायालयाने शनिवारी पोलीसाना दिली असून पाच दिवसात हि चौकशी संपवण्याचे निर्देश देखील न्यायालयाने पोलिसांना दिले आहे. दरम्यान पोलिसांनी पायलचे हस्ताक्षर आणि तिच्या मोबाईल मध्ये मिळून आलेली सुसाईड नोट हस्ताक्षर तज्ज्ञकडे शनिवारी पाठ्वण्यात आली आहे. त्याचा अहवाल आठवड्याभरात येण्याची अपेक्षा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पायलने आत्महत्येप्रकरणी अटक कऱण्यात आलेल्या डॉ. भक्ती मेहरे, डॉ. अंकिता खंडेलवाल आणि डॉ. हेमा आहुजा या तिघांची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीची मुदत संपली होती. शनिवारी तिघींना विशेष सत्र न्यायालयात हजर कऱण्यात आले होते. न्यायालयाने तिघींच्या न्यायालयीन कोठडीत २२ जुलै पर्यंत वाढ केली आहे. पायलने मृत्यू पूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोटची फोटो कॉपी पायलच्या मोबाईल फोनमध्ये मिळून आली आहे, मात्र या सुसाईड नोटची मूळ प्रत या तिघींनी नष्ट केली असून या प्रकरणी या तिघीकडे चौकशी करण्यासाठी या गुन्हयाचा तपास करणारे पोलीसअधिकारी यांनी न्यायालयाकडे परवानगी मागितली. न्यायालयाने पोलिसांना यासाठी परवानगी दिली असून मात्र सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसात सकाळी ९ ते ५ या वेळेतच तुरुंगात जाऊन चौकशी करावी असे निर्देश पोलिसांना न्यायालायने दिले आहे.

- Advertisement -

पायलने आत्महत्या केल्यानंतर पोलीसाना तिच्या खोलीत मोबाईल फोन मिळून आला होता, तो मोबाईल फोन तपासणीसाठी पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आला होता. पायलच्या मोबाईल फोन मध्ये या गुन्ह्यासंदर्भात मिळून आलेले पुरावे एका सीडी मध्ये टाकून ती सीडी फॉरेन्सिक लॅबकडून पोलिसांना देण्यात आली होती. या सीडी मध्ये या गुन्ह्यासंदर्भातीळ महत्वाचे पुराव्यासह पोलिसांना पायलने स्वतःच्या अक्षराने लिहलेली सुसाईड नोटची फोटो कॉपी मिळून आली आहे. ४ पानाचे हे सुसाईड नोट असून पायलने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटचे तिच्या मोबाईल फोनमध्ये फोटो काढून ठेवले होते. मात्र पोलिसांना या सुसाईड नोटची मूळ प्रती मिळून आलेल्या नाही. या सुसाईड नोटच्या मूळ प्रती अटकेत असलेल्या तिन्ही डॉक्टरानी नष्ट केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. शनिवारी पोलिसांनी पायलचे हस्ताक्षर आणि तिच्या मोबाईल मध्ये मिळून आलेली सुसाईड नोट हस्ताक्षर तज्ज्ञकडे पाठ्वण्यात आली आहे. त्याचा अहवाल आठवड्याभरात येण्याची अपेक्षा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पायलच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनाच्या वेळी काढण्यात आलेला व्हिसेरा पोलिसांनी तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात होता, त्याचा अहवाल शनिवारी पोलिसांचा हाती लागला असून या अहवालात संशयास्पद काहीहि आढळून आलेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -