घरक्रीडाभारतीय क्रिकेट संघाची सुरक्षा राम भरोसे

भारतीय क्रिकेट संघाची सुरक्षा राम भरोसे

Subscribe

इंग्लडमध्ये सध्या सुरू असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेतील भारत आणि श्रीलंका सामना सुरू असताना शनिवारी स्टेडियममध्ये अचानक घुसखोरी करून ‘जस्टिस फॉर काश्मीर’ असे बॅनर फडकवणारे विमान फेर्‍या मारू लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. या धक्कादायक प्रकारामुळे खेळाडू आणि प्रेक्षकांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून आले आहे. क्रिकेट वर्ल्डकप ही जगातील काही महत्त्वाच्या स्पर्धांपैकी एक असल्यामुळे खेळाडूंची तसेच प्रेक्षकांची सुरक्षा व्यवस्था तेवढीच महत्त्वाची असते.परंतु, इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत संघांची सुरक्षा वार्‍यावर असल्याचे पुढे आले आहे.

सामन्या सुरू असताना एका विमानाने आकाशात पाच घिरट्या मारल्या. हेलिकॉप्टरमधून एक बॅनर बाहेर झळकत होता आणि त्यावर ‘जस्टिस फॉर काश्मीर’ असे इंग्रजीत लिहिण्यात आले होते. ते विमान कोणाचे होते? त्यात कोण व्यक्ती होत्या? याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. परंतु, आयसीसी आणि स्थानिक पोलिसांनी ही घटना खूपच गांभीर्याने घेतली आहे. तसेच आयसीसीने पोलीस प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली आहे.‘या आधी झालेल्या अशा घटनेमुळे आम्ही पोलीस प्रशासनाशी बोललो होतो.

- Advertisement -

स्थानिक पोलिसांनी अशाप्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाही असे आश्वासन दिले होते. परंतु, अशी घटना पुन्हा घडल्यामुळे आम्ही नाराज आहोत,असे आयसीसीच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. याआधी भारतीय संघ राहत असलेल्या हॉटेलमध्ये लोकांची ये-जा वाढल्यामुळे बीसीसीआयने आयसीसीकडे भारतीय संघाची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज घडलेल्या घटनेनंतर बीसीसीआय आणि आयसीसी भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेसाठी कोणती पावले उचलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याआधीही घडली होती घटना
याआधीही अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान ‘जस्टीस फॉर बलुचिस्तान’ असे बॅनर लावलेल्या विमानाने स्टेडियमभोवती घिरट्या घातल्या होता. याचा कोणताही तपास अद्याप समोर आलेला नाही. उलट याकडे स्थानिक सुरक्षा व्यवस्था आणि आयसीसीने दुर्लक्ष केले असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -