घरCORONA UPDATECoronaVirus: मुंबईकरांनो मास्क वापरा नाहीतर होईल गुन्हा दाखल!

CoronaVirus: मुंबईकरांनो मास्क वापरा नाहीतर होईल गुन्हा दाखल!

Subscribe

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १००० पार झाला आहे.  त्यापैकी निम्माहून अधिक कोरोनाचे रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महापालिकेने एक मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे. मुंबईत घराबाहेर पडताना आणि सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरणे आता बंधनकारक केलं आहे. जर मास्क वापरला नाही तर भा.दं.वि कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्यामुळे आता मुंबईकरांना मास्क वापरणं बंधनकारक ठरणार आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका आयुक्तांनी आदेशात म्हटलं की, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क अत्यावश्यक असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना आणि कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरणे गरजेचे आहे. साथीचा रोग कायदा १८९७ अंतर्गत महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी हे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

या आदेशानुसार रस्ते, रुग्णालय ,कार्यालये, बाजारपेठा अशा सर्व ठिकाणी शक्यतो ३ थराचा किंवा चांगल्या पद्धतीने घरी बनवलेला स्वच्छ मास्क घालणे बंधनकारक आहे. याशिवाय वाहन चालवताना ड्राइव्हर आणि गाडीत बसलेल्या सर्वांनी मास्क घालणे आवश्यक आहे. मास्क घातल्याशिवाय कुणीही बैठकांना किंवा कुठल्याही कार्यक्रमाला बसू नये. उपस्थित राहू नये. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलिस किंवा सहाय्यक आयुक्त यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी कारवाई करतील, असेही आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क लावण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आल्यानंतर,  या मास्कचा वापर केल्यानंतर तो रस्त्यांवर फेकला जावू शकतो. परिणामी त्यापासून याचा संसर्ग वाढू शकतो. ही भीती लक्षात  घेता अशाप्रकारे मास्क वापरुन सार्वजनिक ठिकाणी फेकले गेल्यास त्यांची विल्हेवाट जैविक कचऱ्याप्रमाणे लावली जावी, अशी सूचना भाजपच्या नगरसेविका राजेश्री शिरवाडकर यांनी केली होती.

- Advertisement -

मुंबईत काल एकाच दिवसात ११६ कोरोनाचे रुग्ण आढळले होते. त्यामुळे ही वाढती रुग्णांची संख्या मुंबईकरांच्या चिंतेत भर टाकणारी ठरत आहे. त्यामुळे मुंबईत अनेक हॉटस्पॉट देखील तयार झाले आहेत. मुंबई अगोदर विविध राज्याने मास्क वापरण्याबाबत निर्णय घेतला आहे. चंदीगड आणि ओडिसा सरकारनेही सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरणे बंधनकारक केलं आहे.


हेही वाचा – वरळी, प्रभादेवीकरांनो सावध व्हा! जी-दक्षिण विभागात १३३ कोरोनाबाधित


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -