घरCORONA UPDATECoronavirus: कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या मुलांचा वडिलांच्या शवाला हात लावण्यास नकार

Coronavirus: कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या मुलांचा वडिलांच्या शवाला हात लावण्यास नकार

Subscribe

दादर (पश्चिम) येथील एका इमारतीत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. मात्र, बारा तास ज्येष्ठाचा मृतदेह घरीच पडून होता. विशेष म्हणजे याच कुटुंबातील एका सदस्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मात्र, मोठ्या प्रयत्नानंतर रुग्णवाहिका दाखल झाली. परंतु कोरोनामुळे मृत्यू झालेल्या या व्यक्तीच्या शवाला रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी हात लावण्यास नकार दिला. परंतु त्यांची दोन्ही मुले कोविड १९ पॉझिटिव्ह असूनही त्यांनीही बापाचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवण्यास नकार दिला. पोटच्या पोरांनी बापाच्या शवाला हात लावण्यास नकार दिल्यानंतर अखेर बारा तासांनी महापालिकेने दोन कामगारांना पीपीई किट देत त्यांचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी नेले.

मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर विभाग कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या इमारतीत रविवारी पहाटे पाचच्या सुमारास एका ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला होता. याच ज्येष्ठ नागरिकाच्या सुनेचा काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्यामुळे स्थानिक नगरसेविकेच्या प्रयत्नानंतर महापालिकेच्या रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. परंतु त्यातील कर्मचाऱ्यांनी शवाला हात लावण्यास नकार दिला. या कामगारांना पीपीई किट देण्याची तयारी दर्शवण्यात आली. खुद्द सहायक आयुक्त किरण दिघावकर, नगरसेविका आणि महापालिका सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी त्यांना विनंती केली. त्यांना रुग्णवाहिकेचे अधिक पैसे देण्याची तयारी दर्शवली. तरीही ते तयार झाले नाही. रुग्णवाहिकेमध्ये शव ठेवल्यास घेवून जावू, असे ते सांगू लागले.

- Advertisement -

या ज्येष्ठ नागरिकाच्या दोन्ही मुलांना आणि सुनेला कोरोनाची बाधा झाल्याने या दोन्ही मुलांना वडिलांचा मृतदेह उचलून रुग्णवाहिकेमध्ये ठेवण्यची विनंती केली. परंतु या दोन्ही मुलांनी वडिलाच्या शवाला हात लावण्यास नकार दिला. अखेर विभागीय आरोग्य अधिकारी आणि सहायक आयुक्तांनी पीपीई किट देत दोन कामगारांना तयार केले आणि ते शव संध्याकाळी पाच वाजता रुग्णवाहिकेत ठेवून अंत्यसंस्कारासाठी नेले.

याबाबत स्थानिक नगरसेविका आणि सभागृहनेत्या विशाखा राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, “त्या ज्येष्ठाचा मृत्यू पहाटे पाच वाजता झाला असून त्याच घरातील त्यांच्या एका सुनेचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्या सुनेच्या मृत्यूनंतर या इमारतीचे तीन वेळा सॅनिटायझेशन करून आसपासपाच्या घरातील लोकांची कोरोना चाचणी केली होती. त्यामध्ये मृत पावलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या दोन मुलांना आणि एका सुनेलाही कोरोनाची बाधा झाल्याची बाब समोर आली. परंतु सकाळी याच घरातील एका ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्याला मिळाल्यानंतर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पाटील यांच्या मदतीने प्रयत्न केले.” असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

परंतु मृतदेह नेण्यास आलेल्या रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी त्यांच्या शवाला हात लावण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्या ज्या देान्ही मुलांना बाधा झाली होती, त्यांना वडिलांचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवण्याची सूचना केली. मात्र,त्यांनी तसे करण्यास नकार दिला. त्यामुळे महापालिकेने दोन कामगार तयार करून संध्याकाळी पाच वाजता त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी पाठवला. तसेच त्यानंतर दुसऱ्या एका रुग्णवाहिकेमधून दोन्ही मुले, सुन आणि त्यांच्या मुलांनाही कोरोनाच्या उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे राऊत यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -