घरताज्या घडामोडीडोंबिवलीत कोरोना रुग्णाची मृत्यूनंतरही परवड; अंत्यसंस्कारासाठी जावे लागते कल्याणला

डोंबिवलीत कोरोना रुग्णाची मृत्यूनंतरही परवड; अंत्यसंस्कारासाठी जावे लागते कल्याणला

Subscribe

कोरोना रूग्णांना वेळेत रूग्णवाहिका आणि बेड मिळवण्यासाठी खूपच धावाधाव करावी लागत असतानाच आता मृत्यूनंतरही डोंबिवलीत अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी मिळत नसल्याची धक्कादायक बाब ज्येष्ठ पत्रकार विकास काटदरे यांच्या मृत्यूनंतर उजेडात आली आहे. डोंबिवली स्मशानभूमी मधील गॅस शवदाहिनी ओव्हरलोड झाल्याने त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कल्याणची लालचौकी स्मशानभूमी गाठावी लागली. त्यामुळे कोरोना रूग्णांची मृत्यूनंतरही परवड होत असल्याचे समोर आले आहे.

ज्येष्ठ पत्रकार विकास काटदरे यांचा बुधवारी संध्याकाळी आकस्मिक मृत्यू झाला. त्यांना श्वसनास त्रास होत असल्याने बुधवारी सकाळी त्यांनी कोविड चाचणी केली हेाती. मात्र रिपोर्ट येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास चक्कर आल्याने ते घरातच कोसळले. मात्र रूग्णवाहिका येण्यास तब्बल एक तास उशीर लागला. सर्वप्रथम रूग्णवाहिकेतून त्यांना बाज आर आर रूगणालयात आणि त्यानंतर शास्त्रीनगर रूग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना कोविड संशयित म्हणून प्रमाणित केले. डोंबिवली शवदाहिनी स्मशानभूमी ओव्हरलोड झाल्याने बंद करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना कल्याणला घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. कल्याणच्या बैलबाजार स्मशानभूमीत सव्वा तास वेटींग असल्याने लालचौकी स्मशानभूमीत नेण्यात आले. मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी काटदरे यांच्या पार्थिवाला हात लावण्यास नकार दिला. त्यामुळे पत्रकार अनिकेत घमंडी आणि काटदरे यांचा मुलगा सचिन यांनी मृतदेह गॅस शवदाहिनीवर ठेवला. त्यानंतरच काटदरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisement -

डोंबिवलीतील पाथर्ली स्मशानभूमीतील कर्मचारी कोविड पॉझिटीव्ह आल्याने ही स्मशानभूमी बंद करण्यात आली आहे. तर शिवमंदिर मोक्षधाम स्मशानभूमीत दिवसभरात ९ ते १० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याने ती ओव्हरलोड झाल्याने बंद ठेवण्यात आली होती, अशी माहिती चौकशी केल्यानंतर प्रशासनाकडून देण्यात आली. डोंबिवलीत एकूण पाच स्मशानभूमी आहेत. शिवमंदिर स्मशानभूमीवर सर्वाधिक लोड आहे. ठाकुर्ली चोळे गाव येथे तीन चार एक जागा आहे मग ती जाग काय उपयोगाची आहे. त्यामुळे डोंबिवलीत एक स्मशानभमी कोविड रूग्णांसाठी ठेवण्यात यावी याकडे घमंडी यांनी लक्ष वेधले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -