घरगणपती उत्सव बातम्यालाखमोलाच्या बाप्पाला कोट्यवधींचे विमा कवच

लाखमोलाच्या बाप्पाला कोट्यवधींचे विमा कवच

Subscribe

दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी विविध गणेशोत्सव मंडळांची तयारी पूर्ण झाली आहे. लालबागचा राजा, जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि अंधेरीचा राजा यासारख्या भक्तगणांची अलोट गर्दी लोटणार्‍या गणेशोत्सव मंडळांनी दरवर्षीप्रमाणे जय्यत तयारी केली आहे.

दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी विविध गणेशोत्सव मंडळांची तयारी पूर्ण झाली आहे. लालबागचा राजा, जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि अंधेरीचा राजा यासारख्या भक्तगणांची अलोट गर्दी लोटणार्‍या गणेशोत्सव मंडळांनी दरवर्षीप्रमाणे जय्यत तयारी केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंडळांनी लाखमोलाच्या गणरायांसह उत्सव कालावधींचा विमा काढून सुरक्षा कवच धारण केले आहे.

अनेक मंडळानी कोट्यवधी रुपयांचे विमे काढले असून यात सुवर्ण गणपती म्हणून ख्याती असलेल्या जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने तब्बल २६४.६५ कोटींचा विमा उतरविला आहे, अशी माहिती जीएसबी मंडळाकडून देण्यात आली. यापाठोपाठ लालबागचा राजा मंडळाने २५ कोटी रुपयांचा विमा उतरविल्याची माहिती दिली आहे.  मुंबईसह राज्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि आनंदात गणेशोत्सव साजरा केला जातो. यात मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव जगभरातील गणेशभक्तांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. त्यात प्रामुख्याने लालबागचा राजा, अंधेरीचा राजा, जीएसबी सार्वजनिक गणेेशोत्सव मंडळ आणि गणेशगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह इतर मंडळांचा समावेश आहे

- Advertisement -

या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक हजेरी लावतात. त्यामुळे भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून मंडळांकडून विविध उपाययोजना केल्या जातात. या उत्सव कालावधीत समाजकंटकांकडून उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो. तर मंडळांकडून मोठे देखावे बनविण्यात येतात. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून मंडळांकडून उत्सव कालावधीचा विमा उतरविण्यात येतो. त्यानुसार यंदाही मंडळांकडून विमा उतरविण्यात आला आहे. ज्यात जीएसबी मंडळाने सर्वाधिक रकमेचा विमा उतरविला असून यंदा त्यांनी २६४ कोटींचे विमा संरक्षण घेतले आहे.

जीएसबी मंडळाच्या पाठोपाठ जगभरात प्रसिद्ध असा ‘लालबागचा राजा’ अशी ख्याती असलेल्या लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या वर्षी २५ कोटींचा विमा उतरवला आहे. यामध्ये ५.५ कोटी रकमेचा विमा गणपतीच्या दागिन्यांसाठी उतरविण्यात आला असून भाविकांच्या सुरक्षेसाठी ५ कोटींचा विमा काढण्यात आला आहे. तर येणार्‍या भाविकांसाठी ५ कोटी तर उभारण्यात आलेल्या मंडपासाठी २.५ कोटीचा विमा काढण्यात आला आहे, असे मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले.

- Advertisement -

 लालबागमधील दुसरे प्रसिद्ध ‘मुंबईचा राजा’ अशी ख्याती असलेले मंडळ म्हणजेच लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ-गणेशगल्ली यांनी यंदा ५.५ कोटींचा विमा उतरवला आहे. यामध्ये आगमनापासून विसर्जनापर्यंत गणपती बाप्पाची मूर्ती, तिथे येणारे गणेशभक्त, मंडप, दागिने, आणि तिथे असणारे कार्यकर्ते यांचा समावेश आहे, असे मंडळाचे सचिव स्वप्निल परब यांनी सांगितले. तर यंदाच्या वर्षी अष्टविनायकातील थेऊर येथील चिंतामणीच्या प्रतिकृती मंदिरात विराजमान होणार्‍या ‘अंधेरीचा राजा’ या मंडळाने या वर्षी ५ कोटी ५४ लाख ५० हजारांचा विमा काढला आहे. यामध्ये दागिने, भाविक, मंडप यांसारख्या इतर गोष्टींचादेखील समावेश आहे, अशी माहिती मंडळाचे प्रवक्ते उदय सालियन यांनी दिली.    गिरगावचा राजा म्हणजेच निकदवरी लेन सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ यंदा ५ कोटींचा विमा उतरवणार आहे, असे मंडळाचे कार्यकारी सदस्य गणेश लिंगायत यांनी सांगितले. या सोबतच काळाचौकीच्या महागणपतीचा यंदा ५० लाखांचा विमा काढण्यात आला आहे.

दरवर्षी मोठ्या आनंदात आणि उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत अनेक गणेशभक्त दर्शनासाठी येतात. यांचा संपूर्ण प्रवास चांगला आणि सुरक्षित व्हावा म्हणून आम्ही विमा उतरवितो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे श्रींच्या दर्शनासाठी येणारे भक्त हे खूप महत्त्वाचे असतात. कारण देव भक्तांमुळे आहे, म्हणून त्यांची काळजी घेणे हे आम्ही मंडळाची जबाबदारी समजतो, त्यासाठी या विम्यात त्यांनाही आम्ही सामावून घेतले आहे.
– गणेश लिंगायत, कार्यकारी सदस्य, गिरगावचा राजा.

सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम  १९ कोटी 
नैसर्गिक दुर्घटना                             १ कोटी 
गणेश भक्त आणि मंडप                    १ कोटी 
वैयक्तिक दुर्घटना 
(२२४४ भक्तांसाठी प्रत्येकी १०लाख)   २२४.४० कोटी
स्टँडर्ड पेरील पॉलिसी                       ३५ लाख 
जीएसबी मंडळाचा एकूण विमा          २६४ कोटी 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -