घरमुंबईअरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होणार; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होणार; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

Subscribe

चक्रीवादळ राज्यात धडकण्याची शक्यता नाही. मात्र वादळाच्या प्रभावामुळे किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

कोकणासह मुंबईमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होणार असल्याने पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. चक्रीवादळामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तवर ११ ते १२ जूनला अरबी समुद्रात जाऊ नये असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ ११ ते १२ जून दरम्यान राज्याच्या किनारपट्टीवर सुमारे ३०० किलोमीटर दूर राहणार आहे. हे चक्रीवादळ राज्यात धडकणार नाही. मात्र या चक्रीवादळामुळे कोकणासह मुंबईत पावसाच्या सरी कोसळणार आहेत. हे चक्रीवादळ राज्यात धडकण्याची शक्यता नाही. मात्र वादळाच्या प्रभावामुळे किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या काळात चक्रीवादळाच्या टप्प्यात असलेला आणि किनारपट्टीजवळ असलेला समुद्र काही प्रमाणात खवळलेला दिसणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाणे टाळावे असे देखील हवामान खात्याने सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -