घरमुंबईमालाडच्या मालवणीत सिलेंडरचा स्फोट; एकाचा मृत्यू तर चार जण जखमी

मालाडच्या मालवणीत सिलेंडरचा स्फोट; एकाचा मृत्यू तर चार जण जखमी

Subscribe

मुंबईतील मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मुंबईतील मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या स्फोटात एकाचा मृत्यू झाल असून चार जण जखमी असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, जखमींवर कांदिवली येथील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ही दुर्घटना आज, रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.मालाड येथील एमएचबी वसाहतीत हा स्फोट झाला असून स्फोटानंतर चाळ कोसळून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर ४ जण जखमी झाले आहेत. मंजू आनंद (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे.

- Advertisement -

काय आहे घटना 

गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर मंजू आनंद या महिलेच्या अंगावर चाळीची भींत कोसळल्यानंतर तिला तातडीने बाहेर काढून जवळच्या सामान्य प्रशासन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तर जखमींपैकी ममता पवार (वय २२) ही महिला सुमारे ८० टक्के भाजली असून तिची प्रकृची गंभीर असल्याचे समजते. शिवाय अश्विनी जाधव (वय २६) ही तरुणीही या दुर्घटनेत १५ टक्के भाजली असल्याचे समजते. तसेच शीतल काटे (वय ४४) आणि सिद्धेश गोटे (१९) हेदेखील या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर मालाड मालवणी येथील भारत माता शाळेसमोरील चाळ क्रमांक ९१ कोसळण्याची घटना घडली. त्यानंतर घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला.

हेही वाचा –

गणराज रंगी नाचतो!

- Advertisement -

यंदा बाप्पा कोणाक पावतलो?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -