घरमुंबईदादर, वसई रोड स्थानकावरील पादचारी पूल दुरुस्तीसाठी आजपासून बंद

दादर, वसई रोड स्थानकावरील पादचारी पूल दुरुस्तीसाठी आजपासून बंद

Subscribe

२९ मे पर्यंत हे पादचारी पूल बंद राहणार असून या कालावधीमध्ये जिन्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर आणि वसई रोड स्थानकातील पादचारी पूल दुरुस्तीच्या कामााठी आजपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना उर्वरित ४ पादचारी पुलांचा वापर करण्याचे आवाहन केले आहेत. दादर स्थानकातील चर्चगेट दिशेकडील तर वसई रोड स्थानकावरील फलाट क्रमांक ६ आणि ७ वरील मध्यवर्ती पूल आजपासून बंद करण्यात आला. २९ मे पर्यंत हे पूल बंद राहणार आहेत.

दादर आणि वसई रोड स्थानकातील पादचारी पूल १४ मे म्हणजे आजपासून बंद करण्यात आले. दुरुस्तीच्या कामासाठी पादचारी पूल बंद करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हे पूल बंद करण्यात आले आहे. दादर आणि वसई रेल्वे स्थानकावर नेहमीच मोठी गर्दी असते एक पूल बंद करण्यात आल्यामुळे उर्वरीत पुलावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. २९ मे पर्यंत हे पादचारी पूल बंद राहणार असून या कालावधीमध्ये जिन्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी या दरम्यान पर्यायी पुलाचा वापर करावा, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -