घरमुंबईDale Steyn- 'भारतीय प्रेक्षक अक्षरश: वेडे'; डेल स्टेन भारतीयांबद्दल बोलताना झाला भाऊक

Dale Steyn- ‘भारतीय प्रेक्षक अक्षरश: वेडे’; डेल स्टेन भारतीयांबद्दल बोलताना झाला भाऊक

Subscribe

स्टेन भाऊक इतकं प्रेम कुठेच मिळत नाही. "मला हे सगळं नक्कीच आठवेल."

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. याच मंगळवारी त्याने ट्विट करत आपला निर्णय सर्वांना सांगितला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट निवृत्तीनंतर स्टेनने दक्षिण आफ्रिकेच्या मीडियाशी बोलताना आपला भारतीय प्रेक्षकांसोबतचा आणि भारतातला अनुभव सांगितला आहे. डेलने भारत आणि भारतीयांच्या क्रिकेटबद्दलच्या वेडाचा आवर्जून उल्लेख केला. तो म्हणाला की, ‘तुम्ही जेव्हाही भारतात फिरता तुम्हाला एखादा रॉकस्टार असल्यासारखं वाटतं भारत अक्षरश: वेडा आहे!. तुम्ही अगदी हॉलिवूड किंवा बॉलिवूड स्टार असल्यासारखं प्रेम मिळतं. जेव्हा जेव्हा भारतात खेळण्याचा योग आलायं तेव्हा भारतात सराव करतानाही अगदी हजारो लोकं तुम्हाला बघायला येतात.’ डेल स्टेन म्हटलं की, ‘इतकं प्रेम कुठेच मिळत नाही. मला हे सगळं नक्कीच आठवेल.’

डेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कामगिरी

दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघातून डेल स्टेनने २००४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याची एकदिवसीय आणि टी-२० संघातही वर्णी लागली. जगातील वेगवान गोलंदाजामध्ये उत्तम कामगिरी करणारा गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. डेल स्टेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबत आयपीएलही चांगलीच गाजवली. डेक्कन चार्जर्स, गुजरात लायन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैद्राबाद या संघाकडून खेळलेल्या स्टेनने सुरुवातीच्या पर्वात उत्तम कामगिरी केली होती. आता अखेरच्या काही पर्वात दुखापतींनी ग्रस्त डेलवरही विराट कोहलीने भरोसा दाखवत संघात खेळवलं होतं.

- Advertisement -

डेल स्टेनला दुखापतींनी ग्रासलं

स्टेनच्या नावावर सर्वाधिक जलद ४०० कसोटी विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड आहे. हळूहळू दुखापतींनी स्टेनला ग्रासलं आणि त्याची गोलंदाजीतील कमाल कमी होऊ लागली. त्याला हॅमस्ट्रिंग आणि खांद्याच्या दुखापतींमुळे क्रिकेटपासून दूर जावं लागलं. डेल स्टेन २००८ साली दक्षिण आफ्रिका संघाकडून सर्वात जलदगतीने १०० कसोटी विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याने एका वर्षी १४ सामन्यात १८.१० च्या सरासरीने ८६ विकेट्स घेत आयसीसी प्लेयर ऑफ द इयरचा खिताबही पटकावला होता. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया गाजवल्यानंतर स्टेनने २०१० मध्ये भारतीय भूमीवरही आपला जलवा दाखवला होता. त्याने नागपूरमध्ये एका सामन्यात ५१ धावा देत सात विकेट्स मिळवल्या होत्या.


हेही वाचा – IND TEST SQUAD – वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचं कसोटी संघात पदार्पण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -