घरपालघरपालघर जिल्ह्यात विक्रमी लसीकरण

पालघर जिल्ह्यात विक्रमी लसीकरण

Subscribe

पालघर जिल्ह्यासह वसई विरार महापालिकेला प्रथमच बुधवारी तब्बल ६४ हजार लसींचे डोस मिळाले होते. त्यामुळे लस घेण्यासाठी सर्वत्र तुफान गर्दी झाली होती.

पालघर जिल्ह्यासह वसई विरार महापालिकेला प्रथमच बुधवारी तब्बल ६४ हजार लसींचे डोस मिळाले होते. त्यामुळे लस घेण्यासाठी सर्वत्र तुफान गर्दी झाली होती. काही लसीकरण केंद्रावर धक्काबुकीचेही प्रकार घडले. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली होती. कोरोना प्रतिबंधक लस सुरु झाल्यापासून वसई, विरार व पालघर जिल्ह्याला लसीचे अगदीच नाममात्र डोस उपलब्ध करून देण्यात येत होते. आठवड्यातून दोन-तीन दिवसच लस मिळत असल्याने लसीकरण संथगतीने सुरु होते. बुधवारी जिल्ह्यासह वसईकरांनाही सुखद धक्का बसला. आज प्रथमच पालघर जिल्ह्यासह वसई विरार महापालिकेला विक्रमी ६४ हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले. प्रथमच जिल्ह्याला एव्हढ्या मोठ्या संख्येने लस मात्रा उपलब्ध झाल्याने लस घेण्यासाठी विविध केंद्रावर नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसत होते.

वसई विरार महापालिका क्षेत्रात इतर महापालिकांच्या तुलनेत खूपच कमी व धिम्यागतीने लसीकरण सुरु आहे. याबाबत सर्वच थरातून नाराजी व्यक्त केली जात होती. पत्रकारांनीही लसी करणाचा मुद्दा सातत्याने लावून धरला होता. मात्र बुधवारी वसई विरार महापालिका व जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी प्रत्येकी २९ हजार कोविडशिल्डचे मिळून ५८ हजार डोस तर तीन-तीन हजार मिळून सहा हजार कोव्हॅक्सिनचे डोस पुरवण्यात आले. इतक्या मोठ्या संख्येने डोस मिळाल्यानंतर विविध लस केंद्रावर डोस संख्या विभागून देण्यात आली होती. गेल्या काही दिवसापासून वसई विरार महापालिका क्षेत्रातील अनेक लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली होती. परंतु आज ४८ केंद्रावर महिला, रिक्षाचालक आणि तृतीयपंथीयांसाठी लस उपलब्ध करण्यात आली. तर ३ केंद्रावर गर्भवती महिलांसाठी लस उपलब्ध करण्यात आली.

- Advertisement -

जवळपास सहा महिन्यांनी एवढा मोठा लसीचा साठा वसई विरार आणि पालघर जिल्ह्याला मिळाल्याने शिवसेनेने मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचे आभार मानून शिवसेनेकडून लस उपलब्ध झाल्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुसऱ्या बाजूला विरोधीपक्षांनी मात्र शिवसेनेवर टीका केली आहे. आतापर्यंत सरकारने या ठिकाणी दुर्लक्ष केले आहे. गेल्या आठवड्यात ठाणे जिल्ह्याला एक लाख ४३ हजार लसीचे डोस देणारे राज्यशासन पालघर जिल्ह्यावर मात्र अन्याय करत असताना शासनाची पाठ कसली थोपटता, असा सवाल त्यांनी केला आहे.

हेही वाचा –

शिंदे टोलनाक्यावर स्थानिक वाहनांना ‘टोलमुक्त स्वतंत्र लेन’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -