घरमुंबईपाण्याच्या टाकीत पडून चिमुरड्याचा मृत्यू

पाण्याच्या टाकीत पडून चिमुरड्याचा मृत्यू

Subscribe

झाकण नसलेल्या पाण्याचा टाकीत पडून चार वर्षीय वंशचा मृत्यू झाला

नालासोपारा पूर्वेला उघड्या पाण्याच्या टाकीत पडून एका 4 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. वंश चांडलिया असे त्याचे नाव आहे. आचोळे परिसरातील पटकल पाडा, आदर्शनगर या परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी तुळीज पोलीस ठाण्यात बालकाच्या आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बालकाचा मृत्यू बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

आदर्श नगरमध्ये विकास चांडलिया कुटुंब राहते. विकास यांना दोन मुली असून, वंश हे त्यांचे तिसरे अपत्य होते. बुधवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास वंश आपल्या घरच्या परिसरात खेळण्यासाठी बाहेर गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध केली. मात्र त्याचा काही शोध लागला नाही.

- Advertisement -

दुसर्‍या दिवशी सकाळी अखेर पाण्याच्या टाकीजवळ वंशची एक चप्पल आढळून आली. यानंतर टाकीतील पाणी उपसण्यात आल्यावर त्याचा मृतदेह त्यात सापडला. पाण्याच्या टाकीला झाकण नव्हते. त्यामुळे चिमुकल्याचा त्यात पडून मृत्यू झाला. बिल्डरच्या हलगर्जीपणामुळेच वंशचा मृत्यू झाला असून बिल्डरवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी बालकाच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -