घरमुंबईत्या शिक्षकांना संरक्षण देण्याची मागणी

त्या शिक्षकांना संरक्षण देण्याची मागणी

Subscribe

शिक्षक संघटनांनी घेतला आक्रमक पवित्रा

शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न झाल्यामुळे अडचणीत आलेल्या राज्यातील हजारो शिक्षकांसाठी आता शिक्षक संघटना पुढे सरकल्या आहेत. यासंदर्भातील वृत्त आपलं महानगरने प्रकाशित केल्यानंतर तातडीने शिक्षक संघटनांनी याबाबत राज्य सरकारकडे धाव घेत या शिक्षकांना संरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे. याबाबत शिक्षक आमदार कपिल पाटील यांनीही आवाज उठवला असून या शिक्षकांना दिलसा देण्याची मागणी केली असून भाजप शिक्षक सेलचे अनिल बोरनारे यांनी देखील या शिक्षकांना सरंक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे.

राज्यातील हजारो शिक्षकांच्या नोकर्‍यांवर गदा आल्याचे प्रकरण आपलं महानगरतर्फे नुकतेच उजेडात आणले होते. शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य असताना देखील या शिक्षकांना वारंवार संधी देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही हे शिक्षक परीक्षा उत्तीर्ण न झाल्याने राज्यातील सुमारे आठ हजार शिक्षकांसमोर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे आता या शिक्षकांना दिलासा मिळावा यासाठी शिक्षक संघटनांनी आक्रमक रुप धारण केले आहे. याप्रकरणी राज्य सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी करताना हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या अधिकारात निर्णय घेऊन या शिक्षकांना दिलासा द्यावा अशी विनंती नवीन सरकारला करण्यात येणार असल्याचे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी सांगितले. तर राज्याला नवे शिक्षणमंत्री भेटले की या पदवीधर शिक्षकांचे समाजयोन कसे करता येईल याबाबत मी त्यांच्याशी चर्चा करेल असेही ते म्हणाले.

- Advertisement -

तसेच शिक्षकांनी याबाबती घाबरून न जाता निश्चयाने लढा द्यावा आम्ही त्यांच्या मागे आहोत असे आवाहनही पाटील यांनी शिक्षकांना केले आहे. तर शिक्षकांची नियुक्ती शाळांनी व मान्यता देतांना शिक्षणाधिकारी कार्यालयांनी महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील तरतुदीचा अवलंब केल्याने अचानक त्यांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करण्याचे बंधन करणे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे.

यामुळे १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षेतुन कायमचे वगळून त्यांचे वेतन थांबविण्याचे शिक्षण संचालनालयाचे पत्र तातडीने मागे घ्यावे अशी मागणी भाजपा शिक्षक सेल मुंबई-कोकण विभागाचे संयोजक अनिल बोरनारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. मागील सात वर्षांपासून संबंधित शिक्षक शाळांवर अध्यापनाचे कार्य करीत आहेत. वेतन थांबविल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे सगळे शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून टीईटीतुन कायमचे वगळावे तसेच वेतन सुरू ठेवावे अशी मागणी बोरनारे यांनी शासनाकडे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -