घरमुंबईमुंबई महापालिका आयुक्तांच्या इमारतीलाच डेंग्यु, मलेरियाचा विळखा

मुंबई महापालिका आयुक्तांच्या इमारतीलाच डेंग्यु, मलेरियाचा विळखा

Subscribe

महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांचे निवासस्थान असलेल्या नरीमन पाॅईंट येथील सुरुची, सुनिती अपार्टमेंटमध्ये डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण आढळले असल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे आयुक्त जर आपल्या इमारतीची काळजी घेऊ शकत नाही, तर सामान्य जनतेला काय आवाहन करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांचे निवासस्थान असलेल्या नरीमन पाॅईंट येथील सुरुची, सुनिती अपार्टमेंटमध्ये डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण आढळले असल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे आयुक्त जर आपल्या इमारतीची काळजी घेऊ शकत नाही, तर सामान्य जनतेला काय आवाहन करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या आजारावर प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने डेंग्यू आणि मलेरीयाच्या आजाराबाबत ठिकठिकाणी पाहणी सुरू केली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत नरीमन पाॅईंट येथील मंत्रालय, विधानभवन परिसरातील इमारतीत डेंग्यू आणि मलेरियाची उत्पतीस्थाने आढळून आले आहेत.

मेट्रो – ३ च्या कामामुळे उद्भवत आहेत रोग

मंत्रालय परिसरात महापालिका आयुक्तांव्यतिरीक्त न्यायाधीश, उच्चपदस्थ अधिकारी, सनदी अधिकारी यांची निवासस्थाने आहेत. या परिसरांत सुरु असलेल्या मेट्रो – ३ च्या कामासाठी खोदलेले खड्डे भुयारे आणि लोखंडी चँनेल्समध्ये पाणी जमा होऊन त्या ठिकाणी डेंग्यु, मलेरिया डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळले आहे. मागील वर्षी सुरुची, सुनिती अपार्टमेंटमध्ये डेंग्यू आणि मलेरीयाच्या अळ्या आढळून आल्या होत्या. दक्षिण मुंबईतील ए वॉर्ड मध्ये मे महिन्यात मलेरियाचे एकूण 23 रुग्ण आढळले आहेत.

इथे सापडली डेंग्यु, मलेरियाच्या अळ्या

  • बांधकाम सुरू असलेले विधानभवन मेट्रो स्टेशन ॉ
  • महिला विकास मंडळ कार्यालय
  • जनरल जगन्नाथ भोसले रोड
  • मंत्रालय परिसर
  • कफ परेड पोलिस स्टेशनच्या मागील बाजूस
  • मुंबई उच्च न्यायलय, मुख्य इमारत
  • विधान भवनाचा परिसर
  • एसबीआय बँकेचे एटीएम असलेल्या सुरुची, सुनिती अपार्टमेंटमध्ये डेंगी आणि मलेरियाचे रुग्ण आढळलेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -