घरमुंबईउल्हासनगरात डेंग्यू व स्वाइन फ्लूचे रुग्ण

उल्हासनगरात डेंग्यू व स्वाइन फ्लूचे रुग्ण

Subscribe

मागील महिन्यात एका 18 वर्षीय तरुणाचा डेंग्यूने बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच आता एक 12 वर्षीय मुलगी डेंग्यूच्या विळख्यात सापडली आहे. या सोबतच दोन स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. शांतिनगर मध्ये राहणार्‍या संदेश पाल या 18 वर्षीय तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. खेमानी परिसरात राहणारी दृश्य चांदवानी या 12 वर्षीय मुलीला डेंग्यू झाला असून तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या वृत्ताला पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.राजा रिजवानी यांनी दुजोरा दिला आहे. डेंग्यू पॉजिटिव्ह की निगेटिव्ह हे रिपोर्ट मधून स्पष्ट होणार असे सांगून शहरात दोन स्वाईन फ्लूचेचे रुग्ण आढळल्याचे रिजवानी यांनी सांगितले.

डेंग्यूच्या 25 संशयित व 5 लेप्टोस्पाइरोसिस रुग्णाच्या रक्ताचे नमूने तपासण्यात आले. त्यात डेंग्यूचे 2 पॉजिटिव्ह आले असून लेप्टोस्पाइरोसिस चा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. राजा रिजवानी यांनी दिली. जिथे संशयित रुग्ण आढळले अशा परिसरात जंतुनाशक फवारणी, फॉगिंग करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -