घरमुंबईघरात बसून मुख्यमंत्र्यांनी पाठ थोपटून घेतली, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात

घरात बसून मुख्यमंत्र्यांनी पाठ थोपटून घेतली, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात

Subscribe

विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर चौफेर टीका केली आहे. संकट काळात घरात बसून मुख्यमंत्र्यांनी पाठ थोपटून घेतली असल्याची घणाघाती टीका देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होते. या प्रकाशन सोहळ्यात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत होते. उत्तम विरोधी पक्ष म्हणून काम करु तसेच विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली असल्याचेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे. राज्याने आम्हाला बहुमत देऊन सत्तेत बसवले होते. परंतु तुमच्या बेईमानीमुळे आम्हाला विरोधी पक्ष म्हणून राहाव लागत आहे. पण आम्ही कधी घाबरलो नाही. विरोधी पक्ष तर ठीक आम्ही आता उत्तम विरोधी पक्ष म्हणून काम करुन दाखवू असे वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केले आहे.

सरकार नशीबवान त्यांना आमच्यासारखा विरोधी पक्ष मिळाला

देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे की, ठाकरे सरकार नशिबवान आहे. त्यांना आमच्यासारखा विरोधी पक्ष मिळाला ज्याला जबाबदारीची जाणिव आहे. आज सरकारपेक्षा जास्त सक्रिय विरोधी पक्ष दिसतो जनतेमध्ये जाणारा विरोधी पक्ष दिसतो. परंतु कधीही या महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही. आणि जर अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर सत्तेसाठी कधी साथ दिली नाही. जे खर आहे त्यावर बोलो तर जे चुक आहे त्यावर टीका केली असे फडणवीसांनी म्हटले आहे. विरोधी पक्ष म्हणून एक जबाबदारी मिळालेली आहे. सामान्य जनतेची दुःख त्याचे दैन्य त्याच्या आशा, आकांशा या सगळ्या पुर्ण करण्याची आणि सरकारला धारेवर धरण्याची जबाबदारी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

- Advertisement -

विदर्भाशी बेईमानी करु नका – फडणवीस

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री काही दिवसांपुर्वी म्हटले होते. माझ्यात विदर्भाचे रक्त आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच टीका केली आहे. विदर्भातील रक्त असल्याचे ऐकुण आनंद झाला. परंतु नुसते विदर्भाचे रक्त अंगात असून चालत नाही. विदर्भातील अनेक नेत्यांनी बेईमानी केली आहे. म्हणून तुम्ही विदर्भाशी बेईमानी करु नका असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. विदर्भ वैधानिक विकास मंडळ का बंद झालीत. विदर्भाला वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून मराठवाड्याला जे संरक्षण मिळाले होते ते का काढण्यात आले? ते बंद करण्याचे पाप कोणी केले? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विदर्भाला कळाले पाहिजे आणि मग विदर्भाच्या रक्ताबाबत आपण बोलल पाहिजे.

संकट काळात मुख्यमंत्री घरी बसून पाठ थोपटून घेतली

महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. अनेक लोकांचा कोरोनाने मृत्यू होत होता. राज्यात वेगवेगळ्या पॅटर्नच्या नावाखाली मुख्यमंत्र्यांनी आपली पाठ थोपटून घेतली आहे. संकट काळात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नव्हते. समाजाचं दुःख समजून घेतले नाही. अनेकांना कोरोना काळात रुग्णवाहिका मिळत नव्हती तर लोक रस्त्यावर पडत होते. यावेळी भाजपने पुढाकार घेत काम केल्याचे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -