घरमुंबईशेतकर्‍यांची चेष्टा लावलीय का? - धनंजय मुंडे

शेतकर्‍यांची चेष्टा लावलीय का? – धनंजय मुंडे

Subscribe

विधानपरिषदतेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सभागृहात आज चांगलेच संतापले. शेतकऱ्यांच्या खात्यातील पैसे परत घेतल्याने सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा लावलीय का असा सवाल धनंजय मुंडेंनी केला आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात आज अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात अनेक घोषणाचा पाऊस होणार असल्याने सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे. मात्र अर्थसंकल्प सादर होण्याच्याआधीच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम बॅंकेने खात्यातून परत घेतली आहे. त्यामुळे विधानपरिषदतेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सभागृहात आज चांगलेच संतापले. शेतकऱ्यांची चेष्टा लावलीय का असा सवाल सरकारला केला. दरम्यान, स्थगन प्रस्तावाद्वारे शेतकर्‍यांच्या खात्यातील रकमा परत घेतल्याचा मुद्दा उपस्थित करुन या गंभीर विषयावर सभागृहात चर्चा करावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

बँक खात्यातील रक्कम परत घेतली

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झाले आहे. परंतु ही रक्कमही जमा होताच ती काही वेळातच काढून घेतल्याची बाब नांदेड, परभणी, हिंगोली, नागपूर, नाशिक, अहमदनगर जिल्हयात उघडकीस आल्याची बाब धनंजय मुंडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. केंद्रसरकारने मोठा गाजावाजा करुन ही रक्कम जमा झाल्याचा संदेश बँकांच्या सर्व्हर मार्फत मोबाईलवर देण्यात आलेला.

- Advertisement -

नेमकं काय झालं याचा शोध घ्या

बँक खात्यात आलेली रक्कम काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना पैसे लगेच परत गेल्याचे बँक अधिकार्‍यांनी सांगितले. हा प्रश्न धनंजय मुंडे यांनी सभागृहात उपस्थित करुन सर्वांचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांना मेसेज आल्यामुळे शेतकरी रक्कम काढू शकत नाहीत. ही रक्कम परत का गेली याचं उत्तर प्रशासनाकडे नाही. त्यामुळे यामध्ये नेमकं काय आहे याचा शोध घ्यावा अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -