घरमुंबईहिरे व्यापाऱ्याला कुंभमेळ्यातून अटक

हिरे व्यापाऱ्याला कुंभमेळ्यातून अटक

Subscribe

कोटी रुपायांचे हिरे घेऊन पळून गेलेल्या हिरे व्यापाऱ्याला अखेर बेड्या ठोकल्या.

२७ कोटी रुपायांचे हिरे घेऊन पळून गेलेल्या हिरे व्यापाऱ्याला वांद्रे -कुर्ला पोलिसांनी कुंभमेळ्यातून अटक केली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी सुमारे २० कोटी रुपयांचे हिरे आणि ३० लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. अटक करण्यात आलेला हिरे व्यापारी पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून साधूच्या वेशात इलाहाबाद येथील प्रयागराज कुंभमेळा या ठिकाणी दडून बसला होता. तेथून पोलिसांनी त्याला साधूच्या वेशातच ताब्यात घेऊन मुंबईत आणले असून यतिश परेश फीचाडीया (३१) असे अटक करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नांव आहे. दरम्यान त्याचा दुसरा सहकारी याला कल्याण येथून अटक करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

वांद्रे -कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकणी असलेल्या भारत डायमंड बोर्स या ठिकाणी मागील आठ वर्षांपासून यतिश हा हिरे दलालीचे काम करीत होता. दरम्यान हिरे विक्रीसाठी येणाऱ्या हिरे व्यापाऱ्याचे हिरे विक्री करून त्यातून त्याला दलाली मिळत असे. गेल्या आठ वर्षात त्याने हिरे व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन केला होता. मात्र पैश्याच्या हव्यासापायी त्याने आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने व्यापाऱ्यांचे हिरे घेऊन पळून जाण्याचा बेत आखला होता. डिसेंबर महिन्यात यतिशने आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी येणाऱ्या हिरे व्यापाऱ्याचे २७ कोटी रुपयांचे हिरे विकून देतो असे सांगून त्यांने हिरे ताब्यात घेतले आणि २७ कोटीच्या हिऱ्यासह त्याने आपल्या सहकाऱ्यांसोबत मुंबईतून पोबारा केला. या प्ररकणी हिरे व्यापारी सुरेश बोरडा आणि इतर २५ हिरे व्यापाऱ्यांनी वांद्रे -कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यात ११ डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली होती. दरम्यान पोलिसांनी हिरे घेऊन पळून गेलेल्या हिरे व्यापाराच्या शोधासाठी विविध पथके तयार केली.

- Advertisement -

पोलीस पथकाने यतिशच्या काही सहकाऱ्यांना अटक केली, मात्र यतिश आणि त्याचा आणखी एक सहकारी फरार झाले होते. दरम्यान यतिश हा इलाहाबाद येथील प्रयागराज कुंभमेळा या ठिकाणी साधूच्या वेशात दडून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसाचे एक पथक ताबडतोब इलाहाबाद येथे रवाना झाले. पोलीस आपल्या मागावर असल्याचे यतीशला कळताच त्याने साधूचा वेष धारण करून काही साधूच्या मठात आश्रय घेऊन दडून बसला होता. दरम्यान पोलीस पथकाने त्याला एका मठातून ताब्यात घेत मुंबईला घेऊन आले. मुंबईत आणून त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याजवळून पोलिसांनी २० कोटी रुपये किमतीचे हिरे आणि ३० लाख रुपयांची रोकड हस्तगत केली असल्याची माहिती पोलीस उप आयुक्त अनिल कुंभारे यांनी दिली.


वाचा – धूमस्टाईल चोरट्याचे थैमान, दोघे अटकेत

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -