घरमुंबईरेल्वेमधील 330 जीटीबीएस केद्रांवर डिजीटल मंदी

रेल्वेमधील 330 जीटीबीएस केद्रांवर डिजीटल मंदी

Subscribe

रेल्वेच्या तिकिट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी आणि बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी मध्य रेल्वेने जनसाधारण तिकिट बुकिंग सेवक(जीटीबीएस ) नियुक्त केले होते. मात्र आता युटीएस अ‍ॅपच्या वाढता वापरामुळे मध्य रेल्वेच्या 330 जीटीबीएस सेवकांच्या व्यवसाय मंदी आली आहे. पूर्वी एका जीटीबीएस सेवकाकडून 6 हजार 669 तिकीटांची विक्री होत होती. ती आता 4 हजारांपर्यंत खाली आली आहे. अशीच घसरण कायम राहिली तर मध्य रेल्वेच्या जीटीबीएस सेवकांचा व्यवसाय धोक्यात येणार आहे.

रेल्वेने तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने अनारक्षित तिकीटे विक्रीसाठी जनसाधारण तिकिट बुकिंग सेवक(जीटीबीएस ) नियुक्त केले. सद्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात 330 जेटीबीएस आहेत. या जीटीबीएस कडून महिन्याला सरासरी 5 कोटी रुपयांच्या तिकीटांची विक्री होते. त्या माध्यमातून 2 लाख 41 हजार 708प्रवासी प्रवास करतात. हे जीटीबीएस सेवक प्रत्येक तिकिटावर प्रवाशांकडून अधिकृत एक रुपया कमिशन घेत होते.

- Advertisement -

नुकतीच त्यांच्या कमिशनमध्ये वाढ करून ते दोन रुपये करण्यात आले. मात्र 2017 पासून युटीएस अ‍ॅप आल्यामुळे डिजीटल तिकीट खरेदी वाढली. त्यामुळे जेटीबी सेवकांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम दिसू लागला. 330 जीटीबीएस पैकी सर्वाधिक तिकीट विक्री ही ठाणे रेल्वे स्थानकानजीकच्या पूजा शर्मा यांच्या केंद्रावरून होते. तेथे दररोज 6 हजार 669 तिकिटे विकली जात होती. मात्र अ‍ॅपमुळे त्यात याअडीच हजारांची घट झाली आहे.

युटीएस अँप जोरात जेटीबीएस कोमात
मध्य रेल्वेच्या युटीएस अ‍ॅप युजर्सची संख्या 8 लाखांच्या घरात गेली आहेत. तिकीट खिडक्यांवरील वाढत्या गर्दीपासून प्रवाशांची सुटका व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनाने युटीएस अ‍ॅपची निर्मिती केली होती. त्याला मध्य रेल्वेच्या प्रवशांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. रेल्वे मार्गावरील एकूण प्रवाशांपैकी 11.06 टक्के प्रवासी युटीएस अ‍ॅप वापरतात. युटीएस अ‍ॅपद्वारे तिकिट काढल्यावर पाच टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे प्रवाशांमध्ये युटीएस अ‍ॅपची पसंती वाढली आहे.

- Advertisement -

अ‍ॅपचे युजर्स एकूण
जून = 2019 = 6 लाख 23 हजार 308
ऑगस्ट = 2019 = 8 लाख 23 हजार 200

जीटीबीएसच्या तिकीट विक्रीत घट ?
…………………………………..
2018    2019
…………………………………..
ठाणे = 6,669 – 4,616
दिवा = 5,044 – 2,574
कुर्ला =3,274 – 2,354
………………………………..

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -