घरमुंबईक्रीडा स्पर्धांतून विद्यार्थ्यांच्या अंगीकृत गुणांना वाव मिळतो

क्रीडा स्पर्धांतून विद्यार्थ्यांच्या अंगीकृत गुणांना वाव मिळतो

Subscribe

उपायुक्त मुस्ताक शेख यांचे उद्गार

विद्यार्थ्यांच्या अंगातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी मैदानी क्रीडा स्पर्धांची गरज असून या स्पर्धा खेळातूनच आश्रमशाळांत शिक्षण घेणार्‍या दर्‍या खोर्‍यांतील आदिवासी विद्यार्थ्यांना पुढे महाराष्ट्र व देशपातळीवरील क्रीडा स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळू शकते, असे उद्गार आदिवासी विकास विभागाचे उप आयुक्त मुस्ताक शेख यांनी काढले.

शहापूर तालुक्यातील विभागीय क्रीडा स्पर्धांच्या बक्षिस वितरण समारंभात शेख बोलत होते. यावेळी ते म्हणाले, जीवनात शिस्त, संयम व मेहनत फार महत्वाची असते. शहापूर तालुक्यातील अघई मोहिली येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम स्कूल येथे आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांतील मुला-मुलींसाठी तीन दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

शहापुरात आदिवासी विकास विभागातर्फे क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेत ठाणे विभागातून सुमारे अडीच हजार विद्यार्थी सहभागी झालेले होते. यात शहापूर, जव्हार, डहाणू, पेण, घोडेगाव, सोलापूर या आदिवासी विकास प्रकल्पातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

या क्रीडा स्पर्धात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हॅन्डबॉल तसेच वैयक्तीक क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.यात जव्हार 26, डहाणू 20, पेण 8, शहापूर 8, घोडेगाव 2 अशी सांघिक खेळाची पदके प्राप्त झाली. यामध्ये जव्हार तालुका अव्वल ठरला आहे . या विजयी संघाना अमरावती येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धांत सहभागी होता येणार आहे. या स्पर्धांचे उद्घाटन ठाणे आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त संजय मीना यांच्या हस्ते पार पडले होते.

- Advertisement -

उपायुक्त मुस्ताक शेख शहापूर आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुणकुमार जाधव, पेण प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, आत्मा मालिक संस्थेचे कार्याध्यक्ष उमेश जाधव, शहापूर प्रकल्पाचे सहाय्यक शिक्षण प्रकल्प अधिकारी विजय भडगावकर, अपर सहाय्यक प्रकल्प अधिकारी अभय गोवेकर, शशीकांत पाटील, गुरुनाथ तिवरे, रमेश तारमळे, दीपक सोनजे, सुनिल मेणे, शरद गोतारणे, पवन पाटील, प्रणव निकम, सदानंद पवार, रवींद्र घोलप, बी.आर जाधव, अनिल सोनवणे यांसह मोठ्या संख्येने आदिवासी आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश पाटील यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -